Advertisement

Responsive Advertisement

मंत्री तनपुरे यांच्या प्रयत्नाने कोंढवड शाळेला दोन इंटरॅक्टिवे बोर्ड प्राप्त


अहमदनगर : राहुरी तालुक्यातील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढवड या शाळेला दोन इंटरॅक्टिवे बोर्ड प्राप्त झाले आहे. शाळेसाठी हे साहित्य मिळणे कामी कोंढवडचे उपसरपंच दिलीप म्हसे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिवाजीराव औटी यांनी ना. तनपूरे यांच्याकडे विशेष प्रयत्न केले.

यावेळी स्वामी विवेकानंद नर्सिंग होमे माजी अध्यक्ष तसेच गावचे भूषण उत्तमराव म्हसे, नानासाहेब म्हसे, जगन्नाथ म्हसे, उपसरपंच दिलीप म्हसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील हिवाळे, सदस्य शिवाजीराव औटी, अशोक म्हसे, जनार्दन म्हसे, पोपट म्हसे, मधुकरराव म्हसे हे सर्व मान्यवर उपस्थित होते. ना. प्राजक्त तनपुरे यांचे राहुरी बाजार समितीचे माजी उपसभापती साहेबराव म्हसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील हिवाळे तसेच उपाध्यक्ष, सर्व सदस्य, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या