Advertisement

Responsive Advertisement

ऐतिहासिक दौलताबाद किल्ला पर्यटकांसाठी बंद


दौलताबाद -  ऐतिहासिक दौलताबाद किल्ला पर्यटकांसाठी बंद                        अगोदर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानूसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत जवळपास अनेक महिन्यापासून बंद ठेवण्यात आलेला दौलताबाद किल्ला  कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता
परत  कोरोना प्रादुभाव वाढल्याने मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटक स्थळ बंद करण्याचे शासन निर्णय आदेशानुसार  किल्ल्या पर्यटकांसाठी दि १० जानेवारी सोमवार पासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे                         पर्यटनस्थळावर अवलंबुन असणारे गाईड, दुकानदार, फोटोग्राफर,हॉटेल चालक, फळ विक्रेते, पुस्तक विक्रते,कटलरी विक्रते यांना रोजगार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जेम तेम् सुरू असलेंले व्यवसाय बंद झाले आहेत
आता परत त्या व्यवसायिकांना उपासमारीची वेळ आल्या वाचून राहणार नाही.
नेहमी पर्यटकानी भरलेला किल्ला परिसर आज शांतता पसरली होती.
तर अनेक देशातील, राज्यातील, शहरातील, पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले असता त्यांना किल्ला न पाहताच माघारी घरी परतावे लागले
पुढील आदेश येई पर्यंत किल्ला बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले असल्याचे माहिती संबंधित पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्या कडून मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या