Advertisement

Responsive Advertisement

शेतकऱ्यांना कर्जमाफी तर महिलांसाठी शक्ती कायदा आणला; हे तर ‘आपले’ सरकार- आ अंबादास दानवे


औरंगाबाद: दोन वर्षापासून राज्यात आपले सरकार असून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत असून जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. ठाकरे सरकारने ९७ % शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार धावले. पानंद रस्ते योजनेच्या माध्यमातून गावागावात रस्ते या सरकारमुळेच होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ‘शक्ती कायदा’ हा ठाकरे सरकारनेच आणला आहे. असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले. शिवसंवाद मोहीमेनिमित्त आयोजित बैठकीत प्रसंगी ते बोलत होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने शिवसंवाद मोहिमेचे आयोजन औरंगाबाद जिल्ह्यात केले असून रविवारी (दि.१६) या मोहीमेच्या दुसऱ्या दिवशी गंगापूर, वैजापूर तालुक्यातील पिंप्री, जातेगाव, कापूसवाडगाव, डवाळा, वैजापूर शहर, भिंगी, जानेफळ या गावात बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, अविनाश पाटील, लक्ष्मण भाऊ सांगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या शिवसंवाद मोहिमेच्या निमित्ताने आमदार दानवे यांनी प्रत्येक शिवसैनिक, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून राजकीय, सामाजिक परिस्थितीची माहिती कार्यकर्त्यांकडून जाणून घेतली. त्याचप्रमाणे गावातील नागरिकांशी संपर्क करून अडीअडचणी जाणून घेत शक्य तेवढ्या अडचणी जागेवरच सोडवण्यास यावेळी आमदार दानवे प्राधान्य देत आहेत.यावेळी आ. दानवे म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील जवळपास १७८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सरकारमुळे मार्गी लागत आहे. दोन वर्षाच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी झटणारे हे सरकार आहे. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे जनतेचे हित जपणारे हे सरकार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या