Advertisement

Responsive Advertisement

नगर जिल्ह्यात काम केलेल्या २ दिग्गज पोलीस अधिकाऱ्यांची आयपीएसपदी पदोन्नती

अहमदनगर/ मधुकर म्हसे : केंद्र सरकारने राज्यातील एकूण 14 अधिकाऱ्यांना आयपीएसपदी पदोन्नती दिली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात पुर्वी कार्यरत असलेले व सध्या नाशिक लाचलुचपत विभागाचे अधिक्षक सुनील कडसने साहेब व नाशिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड साहेब यांचा समावेश आहे. 

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागला असून त्यात या दोन दिग्गज पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएसपदी पदोन्नती मिळाली आहे. खरे तर 2000 ते 2004 या वर्षात महाराष्ट्र पोलीस दलात उपायुक्त म्हणून रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रमोशन गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित होते. केंद्र सरकारने 2019 आणि 2020 मध्ये आयपीएसची यादी जाहीर न करता तशीच ठेवली होती. त्यामुळे ही बढती रखडली गेली होती. अखेर काल मकरसंक्रांतीच्या दिवशी या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश येऊन धडकले. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांची मकरसंक्रांत गोड झाली, अशी प्रतिक्रिया नाशिक पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक असलेले सुनील कडसने यांचे या यादीत प्रमोशन झाले आहे. कुडासने यांनी अतिशय संवेदनशील व कर्तबगार पोलिस अधिकारी समजल्या जाणाऱ्या मालेगावमध्ये चार वर्षे अप्पर अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. ते 2012-2016 या काळामध्ये मालेगावमध्ये होते. त्यानंतर ते राज्य गुप्तवार्ता विभागात गेले. आता गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. मालेगावमध्ये कोरोना वाढला तेव्हा कुडासने यांची तेथील सेवा पाहता येथील परिस्थिती सुधारण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी ती परिस्थिती सुधारूनही दाखवली. 

नाशिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड साहेब यांनी आपल्या करिअरची सुरुवात नाशिक व रत्नागिरी येथे ट्रेनिंग पूर्ण करून नागपुर ग्रामीणचा चार्ज स्विकारल्यानंतर २००५ साली इंडोरामा कंपनीत दंगल होऊन जाळण्यात आली होती. त्यावेळी ही कंपनी १९ दिवस बंद होती तसेच बोटीबोरी एमआयडीसीत इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये कामगारांच्या गोंधळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. २००६ मध्ये मुंबई, नाशिक पुर परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी निफाडची जबाबदारी त्यांच्याकडे देत गोदावरी नदीकाठच्या चांदुरी, साईखेडा येथील शेतकर्यांची पुर परिस्थिती सुटका केली. २००७ साली राज्यात गाजलेल्या सिन्नर तालुक्यातील जितेंद्र आव्हाड यांचे पास्ते गावी झालेल्या ब्लास्टींग कांडी कारखान्यात झालेल्या ब्लास्ट मुळे २२ लोक मृत्युमुखी पडले होते. त्या प्रकरणाचे धागेदोरे शोधून या प्रकरणाचा तपास नंतर सीआयडीकडे गेला होता. २००८ मध्ये विंचुर येथिल जातीय दंगलीत महत्वाची भूमिका बजावत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले होते. २००९ साली ठाण्यात एसीपी पदावर पदोन्नती झाली. ऑक्टोबर २०१० साली ॲडिशनल एसपी म्हणून नगर मध्ये कृष्ण प्रकाश व आर. डी. शिंदे यांच्या तालिमीत तीन वर्षे काम केले. २०१४ मध्ये मुंबईत दाखल होत डीसीपी आपरेशन म्हणुन काम पाहिले. या कार्यकाळात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे काम केले. यात ३६ आमदार व ६ खासदार असलेले निवडणुक कार्यक्रम यशस्वी पार पडले. त्यानंतर आर आर पाटील यांच्या तुर्ची गावी असलेल्या पोलीस ट्रेनिंग सेंटर कार्य करताना या सेंटरला स्मार्ट पीटीसी मिळाले व येथील वातावरण इकोफ्रेण्डली बनवत उत्तम निकाल लावले. त्यानंतर एसपी सीएम सिक्युरिटीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेची आखणीचे काम पाहिले व उद्धवजी ठाकरे स्वतः गाडी चालवत पंढरपूर जात असताना संरक्षण तााफ्याची प्रमुख जबाबदारी पार पाडली. त्यानंतर नाशिक गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.

या दोन दिग्गज पोलीस अधिकाऱ्यांची आयपीएसपदी पदोन्नती झाल्याने राहुरी बाजार समितीचे माजी उपसभापती साहेबराव म्हसे, नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे व कोंढवड येथील आदर्श जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल हिवाळे यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या