Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबादेत मोकाट जनावरांचा सुळसुळाटऔरंगाबाद : महापालिकेने शहरातून गोठे हद्दपार करण्याची केलेली घोषणा हवेत विरली आहे. गाय, म्हैस, बकऱ्या, घोडे, रेड्यांसह इतर जनावरे शहराच्या विविध भागात मोकाटपणे फिरताना दिसतात. त्यामुळे महापालिकेने नऊ महिन्यात ५९९ जनावरे पकडून त्यांना कोंडवाड्यात कोंडले. पशू मालकांकडून एक लाख १५ हजार ६४० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.शहराच्या विविध भागात विशेषतः खाम, सुखना नदीपात्र, नाल्यांच्या मोकळ्या जागेत अनेकांनी अतिक्रमण करून जनावरांचे गोठे सुरू केले आहेत. या गोठ्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यासोबतच जनावरांचे मल-मूत्र, गोठ्यात निघणारा कचरा यामुळे महापालिकेच्या ड्रेनेजलाईन वारंवार चोकअप होतात. त्यामुळे काही वर्षापूर्वी शहरातील गोठे एकाच ठिकाणी चिकलाठाणा भागात हालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुग्धनगरीसाठी शासनाने महापालिकेला गायरान जमीनही दिली. पण या जागेवर आता कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे.त्यामुळे शहरातील गोठे अद्याप हद्दपार झालेले नाहीत. अनेक पशुपालक दिवसभर जनावरे रस्त्यावर सोडून देतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होता. अशा जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने फिरता कोंडवाडा तयार केला आहे. पकडलेली जनावरे सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयाशेजारी असलेल्या कोंडवाड्यात जमा केली जातात. पशुपालक याठिकाणी येऊन दंड भरून जनावरे घेऊन जातात. गेल्या नऊ महिन्यात ५९९ जनावरे पडून त्यांना कोंडवाड्यात टाकण्यात आले होते. त्यापोटी एक लाख १५ हजार ६४० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी शेख शाहेद यांनी सांगितले.
मोकाट जनावरांमुळे शहरात वाहतुला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी जनावरे मोकाट सोडू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे वारंवार केले जात आहे. त्यानंतरही पशुपालकांची मुजोरी कायम असल्याने यापुढे थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा उपायुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या