Advertisement

Responsive Advertisement

मनसेकडून औरंगाबादेतील मराठी पाट्या असलेल्या दुकानदारांचा सत्कारऔरंगाबाद: कायदा तर आज झालाय. पण आमचे अनेक व्यावसायिक बंधू वर्षानुवर्षे मराठी फलक लावून व्यवसाय करत आहेत. सरकारची अस्मिता आज जागी झाली असेल, पण या माणसांनी मराठी अस्मिता कधीपासूनच जोपासली आहे. अशी जोपासना करणाऱ्या आमच्या मराठी व्यावसायिक बांधवांचा गौरव व्हायलाच हवा या उद्देशाने औरंगाबादेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी पाटी असलेल्या दुकानदारांना गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.नुकतेच मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सर्व दुकाने आणि आस्थापनांमध्ये मराठी भाषेत ठळक अक्षरांत नामफलक लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा विजय आहे. मनसेतर्फे सातत्याने मराठी पाट्यांसाठी आंदोलन केले गेले. अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झालेत तरीही मराठीला न्याय मिळाला या गोष्टीचा जास्त आनंद कार्यकर्त्यांना आहे.औरंगाबाद मध्ये अनेक दुकाने असे आहेत की ज्यांच्या दुकानाच्या पाट्या बऱ्याच वर्षांपासून फक्त मराठीत आहेत. या सर्व दुकांनदाराचा सत्कार मनसेतर्फे करण्यात आला.शहरातील पिरबाजार ही मुख्य बाजारपेठ आहे येथील व्यापाऱ्यांचा शाल, हार आणि गौरव पत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी एकूण ६४ दुकांनदाराचे अभिनंदन-सत्कार करण्यात आले. यावेळी अग्रवाल इंटरप्रायसेस-मनिष अग्रवाल, अश्विनी कॉलेक्शन – माणिक महातोळे, किरण ज्वेलर्स – राजेश खरोटे, पारस स्वीट – नितेश जैन, सुरभी इलेक्ट्रॉनिक,नंदिनी गिफ्ट, न्यू गौरी ज्वेलर्स, सागर प्रोविजन, ऐश्वर्य गारमेंट्स, राजवीर कलेक्शन, नॅशनल चॉईस, वरद साडी सेंटर, कुमार जनरल स्टोर्स, सागर ड्रायफ्रूट या दुकानदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुमीत खांबेकर, आशिष सुरडकर, अविनाश पोफळे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या