Advertisement

Responsive Advertisement

भारतीय जनता पार्टी च्या तालुका उपाध्यक्ष पदी विलास जाधव यांची निवड


दौलताबाद /प्रतिनिधी 

दौलताबाद :येथील सामाजिक कार्यकर्ते विलास जाधव यांची औरंगाबाद पश्चिम ग्रामीण तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदरील नियुक्ती पश्चिम तालुका अध्यक्ष वसंत प्रधान यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे राजु शिंदे यांच्या हस्ते विलास जाधव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.तालुक्यातील पक्षाचे बळकटीसाठी व पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सदरील नियुक्ती करण्यात आली असल्याचे औरंगाबाद पश्चिम तालुका अध्यक्ष वसंत प्रधान यांनी सांगितले.यावेळी भारतीय जनता पार्टी चे शेख बने,बाबासाहेब म्हस्के,कडुबा बळी, शिवाजी हुसे,शेख अमजत,रंजीत जाधव,आदिंची उपस्थिती होती.या निवडीचे स्वागत सुरज जाधव,यमाजी परोडे,गणेश जाधव व परीसरातील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या