Advertisement

Responsive Advertisement

पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कार्याबद्दल शिवाजीराजे पालवे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान


वृक्षमित्र शिवाजीराजे पालवे समाजाचे भूषण -यमनाजी आघाव 

अहमदनगर - माजी सैनिकांना बरोबर घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक प्रमाणात वृक्षरोपण व संवर्धन केल्याबद्दल वंजारी सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने शिवाजीराजे पालवे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे येथे झालेल्या वंजारी सेवा संघाच्या राज्यव्यापी मेळाव्यात केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड व राज्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालवे यांच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. नुकतेच त्यांना अहमदनगर शहरात वंजारी समाज भूषण यमनाजी आघाव यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रामकिसन सोनवणे, विष्णु फुंदे, विकास बडे, ज्ञानेश्‍वर विघ्ने, शिवाजीराव गर्जे, वंजारी सेवा संघ जिल्हाध्यक्ष देविदास दहिफळे, पोपटराव फुंदे उपस्थित होते.

यमनाजी आघाव म्हणाले की, जिल्ह्यातील माजी सैनिकांनी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाकरिता घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. जिल्ह्यात व्यापक प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य सुरु आहे. जिल्ह्यातील उजाड डोंगररांगा, माळरान हिरवाईने फुलविण्यासाठी माजी सैनिक वृक्षरोपण करत आहे. यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून वृक्ष बँकेची देखील स्थापना करण्यात आली आहे. तर अनेक सामाजिक कार्यात पालवे यांचा सातत्याने सहभाग असतो.

वृक्षमित्र शिवाजीराजे पालवे समाजाचे भूषण असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजीराजे पालवे यांनी सत्काराला उत्तर देताना समाजाच्या वतीने मिळालेला पुरस्कार सर्वात मोठा सन्मान आहे. यामुळे आनखी सामाजिक कार्य करण्यास प्रेरणा मिळणार आहे. प्रत्येक माजी सैनिक पुर्ण निष्ठेने देशसेवेसाठी योगदान देत असून, माध्यम जरी वेगळे असले तरी उद्देश मात्र एकच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या