Advertisement

Responsive Advertisement

तलवाड्यात एकतेचा तीळगुळ सामाजीक एकात्मतेचे दर्शन...(शाताराम मगर )


वैजापुर-  तालुक्यातील तलवाडा येथे मकर संक्रांती निमित्त जुन्या परंपरांच जतन व्हावे थोरामोठ्याचे आशिर्वाद मिळवे यासाठी मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप व सर्वानंदगिजी महाराज यांनी संन्यास घेतल्यामुळे पुजन आणि नर्मदा परिक्रमा करुन आलेल्याभाविकांच पुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानिमीत्त शिवाई संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ महाराज पगार यांनी सांगितले की भारतीय संस्कृतीत सणांना अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत. हा सण खरोखरच भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना ह्या दिवशी तिळगुळ देऊन 'तिळगुळ घ्या, गोडगोड बोला' असे म्हणून एमकेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले.

देव तीळी आला ।गोडे गोड जिव झाला।।  
साधला हा प्रवकाळ।गेला अंतरीचा मळ।।  
पाप पुण्य गेले।एका स्नानेचि खुंटले।। 

तुका म्हणे वानी।शुध्द जनार्दण जनी।।  
या अभंगावर विवेचन करतांना महाराज म्हणाले तुकाराम अभंगातुन मानव देहासारखा पर्वकाळ प्राप्त झाला आता आपल कल्याण करुण घ्याव तुकाराम म म्हणतात मला हा पर्वकाळ साधला तुम्ही ही साधुन घ्यावा आसे आव्हान ह.भ.प.पंढरीनाथ महाराज यांनी केले बोलताना महाराज म्हणाले.
जीवनातील अहंकार कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने एकमेंकांना तिळगुळ दिले जाते. 
अहंकार' हा माणसाचा फार मोठा शत्रू. प्रत्येक व्यक्ती अहंकारव्याप्त असते. 
अहंकारात अहं म्हणजे मी प्रभावी असतो. व्यक्ती स्व-भोवती फिरते तेव्हा अहंकार पोसला जातो. माणूस समाजनिष्ठ प्राणी आहे.
 अहंकार बाळगणारी माणसं विकृतीच्या जवळ गेलेली असतात. 'मी'चं आपण होणं म्हणजे अहंकाराला थोडंसं दूर करणं. अहंकारावर विजय मिळवायचा मी कोणीच नाही ही भावना असावी. 'अहंकाराचा त्याग केला की  जगणं उज्ज्वल होतं.आसे भावनिक आव्हान त्यांनी केले.
पुढे बोलताना महाराज म्हणाले
तीळ हे स्नेहाचे, प्रेमाचे, भक्तीचे प्रतीक मानले आहे, तो स्निग्ध आहे. 'देव तिळी आला, म्हणजे देव आच बोलण्यात, सहवासात, प्रेमात आला. आमच्या भक्तीच्या आधीन झाला तृप्त झाला. प्रेम  वाटा प्रेम च मिळेल. आणि या प्रेम संवर्धनात दुःखाची नुसती चाहूलही नाही. म्हणूनच आपण म्हणतो 'तीळ-गूळ घ्या   गोड बोला'नुसती तिळाची स्निग्धता नको तर, गुळाची गोडीही हवीं गूळ गोडवा वाढवतो.असेच शिकविणारा हा संक्रांतीचा सण आहे. 'संक्रांत' हा शब्द काहीजण वाईट या अर्थानेही वापरतात. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, वाईटातून चांगले निर्माण करण्याची ताकद या 'संक्रांती'तच आहे. तुमचा विचार तुमचे आयुष्य बदलतो त्यामुळेच संतांनी विचारांना सुविचारांमध्ये नेण्याचे आवाहन केले आहे. हे सणच नसते तर चांगुलपणाची शिकवण देण्याचे कार्य खुंटले असते. सणांकडे पाहाताना प्रेमाने पाहा असे भावनिक आवाहन पंढरीनाथ महाराज पगार यांनी केले यावेेळी मकरं संक्रांतीच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण करण्यासाठी  कु.उ.बा.समितीचे माजी ऊप सभापती भागिनाथ मगर पुरुषोत्तम महाराज सर्वानंदगिजी महाराज भाऊसाहेब महाराज  चेअरमन विनोद मगर दादाभाऊ मगर शावलालाल मगर विठ्ठल मगर जयराम मगर शिवाजी किटे बाबासाहेब मगर सोपान मगर दत्तु मगर सुनिल घायवट किशोर मगर रवि मगर बाबासाहेब मगर  किशोर मगर  यांच्या्सह ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य पदाधिकारी गावतील नगरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या