Advertisement

Responsive Advertisement

जिजाऊंच्या विचारांमुळे स्वराज्य घडले -डॉ,कृषिराज टकले

अहमदनगर- 
राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या आशीर्वादाने स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवरायांनी पूर्ण केले  , आईसाहेब जिजाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी युद्धनीती, राजनीति हे धडे घेतले
आईसाहेबांच्या  जिजाऊंच्या अथक परिश्रमातून स्वराज्याला शिवबा सारखा लढाऊ योद्धा मिळाला असे मत स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर कृषीराज टकले यांनी व्यक्त केले 
 हातराळ तालुका पाथर्डी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आईसाहेब जिजाऊंची जयंती स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर कृषिराज टकले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली त्याप्रसंगी डॉ टकले हे बोलत होते 
 डॉ, कृषीराज टकले पुढे म्हणाले की ,रयत मोगलांच्या अन्यायाला वैतागलेली असताना शेतकरी राजा मरत असताना रयतेचे राज्य उभे करण्याची ताकद जिजाऊंनी दिली
या जयंती प्रसंगी ,स्वाभिमानी मराठा महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे,हातराळ चे सरपंच भिमराव टकले, युवा नेते नामदेवराव काकडे, ग्रामसेविका अनिता गोसावी ,उपसरपंच सूर्यभान साळवे, बाळासाहेब काकडे ,भाऊसाहेब चन्ने आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या