Advertisement

Responsive Advertisement

फार्मसीच्या विद्यार्थ्यांना उद्योग निरिक्षक पदाच्या पूर्व परिक्षेस पात्र ठरवुन बसण्याची परवानगी द्या- म्हसे


अहमदनगर : बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना उद्योग संचालनालय पदासाठी होत असलेल्या पूर्व परिक्षेस बसण्यासाठी पात्र करण्याची मागणी भाजपचे शरद म्हसे यांनी ईमेल द्वारे मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव ( सेवा ) यांच्या कार्यालयाकडे केली आहे. याबाबत या कार्यालयाकडून श्री म्हसे यांना कार्यवाही सुरू करण्यात आल्याबाबतचा ई-मेल प्राप्त झाला असून, तो पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२१ जाहिरात क्रमांक २६९/ २०२१, दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. सदर परीक्षा ०३ एप्रिल २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२२ आहे. या जाहिरातीत उद्योग निरीक्षक गट-क उद्योग संचालनालय १०३ पदे देखील समाविष्ट आहेत. त्यांसाठी शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी अशी आहे. अर्ज करते वेळी बी. फार्मसी झालेला विद्यार्थी पात्र नाही, असे दर्शविले जातेय. तरी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे विज्ञान शाखेतील सर्व विषय बी फार्मसीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. तरी बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना या पदासाठी पात्र ठरवुन परिक्षेस बसण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या