Advertisement

Responsive Advertisement

प्रहार दिव्यांग संघटनेच्या पांगरी, राजापुर व बाचेगाव येथे शाखा स्थापन....


धर्माबाद:- तालुक्यात दिनांक ९ जानेवारी रोजी आदरणीय मा.आ.राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार तसेच  विठ्ठलराव मंगनाळे जिल्हा प्रमुख नांदेड़  यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या थाटाने व आनंदमय वातावरणात पांगरी, राजापूर व बाचेगाव येथे फलकाचे अनावरण व शाखेची स्थापना झाली सदरील कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून विठ्ठलराव देशमुख (जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष नांदेड) पंढरीनाथ हुंडेकर (जिल्हाध्यक्ष उत्तर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना) व विजयाताई काचावार (जिल्हाध्यक्षा प्रहार जनशक्ती पक्ष नांदेड) या उपस्थित होते. तसेच मागील अनेक दिवसांपासून धर्माबाद प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे कार्य मोठ्या उत्साहात झालु आहे या आगोदर हि तालुक्यातील मौजे माष्टी , बेल्लुर बु , बेल्लुर खुर्द व मौजे जुन्नी या ठिकाणी हि संघटनेचे शाखा स्थापन करण्यात आले आहेत याचबरोबर रविवारी पांगरी, राजापूर व बाचेगाव येथे शाखा स्थापन करुन जिल्ह्यात सर्वात जास्त शाखेचे मान सध्या धर्माबाद तालुक्याला मिळाले आहे. सदरील कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत करुन   धर्माबाद तालुक्याचे अध्यक्ष साईनाथ पाटील जुन्नीकर व सर्व धर्माबादच्या पदाधिकारीचे विरील स्तरावरुन कौतुक केले जात आहे. या वेळी प्रमुख पाहूने म्हणून मारोती मंगरुळे, गणेश हांडे आजंनीकर, बालाजी राणोळकर, अनिल शेट्टे मुदखेड, साईनाथ बोईनवाड नायगाव, सौ.संगीता बामणे उमरी, शांताबाई चिंतले बिलोली, शंकरराव शिंदे व तिन्ही गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पत्रकार गणेश पा.राजापूरकर, पत्रकार नारायण सोनटक्के, पत्रकार हाणमंतु देसाई तसेच धर्माबाद तालुका व शहर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या