Advertisement

Responsive Advertisement

जंजाळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही; राज्यमंत्री सत्तार यांची ग्वाही


औरंगाबाद : मतदार संघातील किल्ले व लेण्यांचा विकास व संवर्धन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच येथील छोट्या व्यावसायिकांना चालना मिळावी यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील पर्यटनाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा जेणे करून येत्या मार्च महिन्यात यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल. यासाठी निधी कमी पडू देणार नाही. अशी काही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी दिली.सिल्लोड तालुक्यातील जंजाळा किल्ला व येथील घटोत्कच लेण्यांची दुरुस्ती, संवर्धन व येथील रस्त्यांच्या विकासासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसुल तथा ग्राम विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शनिवारी (दि.१५) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जंजाळा किल्लाच्या जवळपास ६ किलोमीटर परिघातात पायी चालत संपूर्ण किल्याची पाहणी केली. तसेच याबाबत स्थानिक नागरिक व इतिहास कारांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी निर्देश दिले. यावेळी सिल्लोड चे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता किशोर मराठे, शाखा अभियंता कर्णविशाल चाटे आदींची उपस्थिती होती.किल्ला परिसराची संपूर्ण पाहणी केल्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जंजाळा किल्ल्यातील पुरातन पाणी व्यवस्थापनाची दुरुस्ती, तसेच नवीन सिंचन प्रकल्प करण्यासाठी सर्वेक्षण करणे, किल्ला व लेणी येथे येण्यासाठी सोयगाव व जंजाळा गावातून रस्ता तयार करणे, येथील किल्ल्याची दुरुस्ती, येथील परिसरात जैविक विविधतेने पूर्ण वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेणे, येथील सौंदर्यात भर पडण्यासाठी कास पठार धर्तीवर उपाययोजना करणे, देश विदेशातील पर्यटक लेणी व किल्ला पाहण्यासाठी येण्याकरिता उपाययोजना करण्यासंदर्भात सविस्तर आराखडा तयार करून परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या