Advertisement

Responsive Advertisement

कोंढवडच्या आदर्श जिल्हा परिषद शाळेत पत्रकारांचा सन्मान

राहुरी : शाळेचा सर्वांगीण विकास झाल्यास विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारून गावाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. यातून ग्रामस्थांची आर्थिक उन्नती होऊन गावाचा विकास होईल, असे मत नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे यांनी व्यक्त केले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढवड येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ म्हसे होते तर उत्तमराव म्हसे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष साहेबराव म्हसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांनी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे व पुढेही चालू ठेवावे. चांगल्या कार्याला प्रसिद्धी द्यावी. यावेळी पत्रकार मधुकर म्हसे, रुक्मिणीकांत म्हसे यांचा आदर्श शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कोंढवडचे उपसरपंच दिलीप म्हसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल हिवाळे, शिवाजीराव औटी, म्हैसगावचे कामगार तलाठी संजय डोखे, मुख्याध्यापिका सौ सरस्वती खराडे, शिक्षिका हीरा चंदने, शिक्षक दिलीप वर्पे, शिवाजी कुलट, विजय कदम, बाळकृष्ण देवरे, बाळु आमले, भागवत पुंड आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या