Advertisement

Responsive Advertisement

बीड जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकणार -शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

बीड, पाटोदा, केज आदी ठिकाणी पदयात्रा, कॉर्नर बैठकांना उस्फुर्त प्रतिसाद

बीड : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकास कामांमुळे सर्वसामान्य जनता समाधान व्यक्त करत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी नागरिकांचा जबरदस्त पाठींबा मिळत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व्यक्त केला. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी जनतेला मतदानरुपी आशीर्वाद द्यावा, विकासकामे पूर्ण करू असे सांगितले.
मंगळवार, १८ जानेवारी ला उर्वरीत होणाऱ्या जगासाठी आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड, पाटोदा, केज आदी ठिकाणी पदयात्रा, कॉर्नर बैठका घेण्यात आल्या.
पाटोदा येथे वॉर्ड क्र. ९ कल्पना काशीद, वॉर्ड क्र. ६ चांगदेव गीते, आदींसह केज वार्ड क्र. १ गायकवाड कविराज, वार्ड क्र. २ दांगट सजनाबाई, वार्ड क्र. ८ दुनघव रूपाली व वार्ड क्र.१२ वळसे बाळासाहेब या शिवसेनेच्या उमेदवारांना आशीर्वाद रुपी मत देऊन निवडून देण्याचे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. यावेळी मतदारांचा प्रतिसाद पाहता शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्कप्रमुख  चंद्रकांत खैरे  व माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर,विधानसभा संघटक राजू वैद्य, जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, माजी जिल्हाप्रमुख आनिल जगताप, कुंडलिक खांडे, विलास  बडगे, सभापती दिनकरराव कदम, दिलीप  गोरे, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, महिला जिल्हाप्रमुख संगीत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख गणेश  वरेकर, गिरीश  देशपांडे, तालुका प्रमुख रत्नाकर  शिंदे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या