Advertisement

Responsive Advertisement

एस टी महामंडळाच्या महाव्यवस्थापक पदी माधव काळे यांची नियुक्ती


औरंगाबाद - एस टी महामंडळाच्या कर्मीक व औद्योगिक संबंध विभागाच्या महाव्यवस्थापक पदी माधव काळे याची नियुक्ती करण्यात आली आहे . माधव काळे यांची महाव्यवस्थापक पदी नियुक्ती झाल्यामुळे
कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ,कारण एक दबंग आणि अभ्यासु अधिकारी म्हणून एस टी महामंडळाला लाभले आहेत.व महाव्यवस्थापक या पदाची यशस्वीपणे धुरा सांभाळणारे अभ्यासु , निर्णयक्षमता अचुक व निर्भिड असणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांनी अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षेत असलेले उमेदवारास रा प सेवेत नेमणूक होण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय मार्गी लावले आहे.त्यामुळे त्या उमेदवार, कुटुंबिय आनंद व्यक्त करीत आहे
त्यांची नेमणूक झाल्याने रखडलेल्या कामगार हिताच्या प्रश्नांला गती मिळेल असा विश्वास कामगार व्यक्त करीत आहेत.त्यांचे या नियुक्तीबद्धल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या