Advertisement

Responsive Advertisement

नामविस्तार दिन हा घरूनच अभिवादन करा पोलिस उपायुक्त उज्वला वनकर यांची डॉ बाबासाहेब आंबेडकरविद्यापीठ येथे बैठक संपन्न


औरंगाबाद / प्रतिनिधी फिरोज शेख :- नामविस्तार दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील गेस्ट हाऊस येथे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 सो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस माननीय सहायक पोलिस आयुक्त शहर विभाग तसेच पो नि छावणी तसेच  बेगमपुरा पोलिस निरीक्षक पोद्दार व शहरातील आंबेडकरवादी  विविध संघटनेचे पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी हजर होते. सदर बैठकीमध्ये माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 सो यांनी 14 जानेवारी नामविस्तार वर्धापन दिन हा महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या covid-19 च्या अनुषंगाने  मार्गदर्शक सूचना प्रमाणे  आपल्याला घरी राहूनच अभिवादन करणे बाबत मार्गदर्शन केले यावेळी दिनकर दादा ओंकार प्रा.उपाध्यक्ष प्रकाश निकाळजे माजी उपमहापौर शांतीलाल गायकवाड डॉ. संदीप जाधव मराठवाडा कार्याध्यक्ष विजय वाहुळ संजय जगताप माजी नगरसेवक आनंद कस्तुरे नागराज गायकवाड प्रल्हाद गवळी प्रभाकर मगरे देविदास आढाव किशोर थोरात माजी उपमहापौर गौतम खरात राजू आमराव सचिन निकम अमोल खरात दिक्षा पवार जयश्री  शिर्के अॅड अतुल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या