Advertisement

Responsive Advertisement

शेतकऱ्यावर एकावर एक आसमानी संकटे सुरूच


 खुलताबाद-  तालुक्यात व ग्रामीण भागात दाट धुके पसरली आहे खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी व बाजार सावंगी परिसरात , ताजनापुर, येसगाव, कानकशीळ,  शिखपूरवाडी , इंदापुर, व इतर भागात मागील काही दिवसांपासून सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुके पडू लागल्याने शेती पिकांवर रोगराईचे पसरत आहे. या आधी अतिवृष्टीमुळे पीके खराब झाली व आता धुके पडू लागल्याने पीकांनवर रोगराई येत आहे. यामुळे कांदा हरबर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे 

 वाहनधारकांना ही सकाळच्या वेळेस  धुकांनचा सामना करावा लागत आहे असमानी संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. मागील काही वर्षांपासून शेतकर्यांवर काही ना काही सेकट येतच आहे मागील  वर्ष कोरोना मध्ये गेले या वर्षी ओला दुषकाळ पडला व आता धुकांन मुळे शेतीपीकांनवर
रोगराई पसरत आहे

शेतकऱ्यांच्या चिंता परत एकदा वाढू लागल्या शेतकरी आपल्या डोळ्यांनी त्यांनी पेरलेले मालांचे नुकसान तो पाहत आहे शेतकऱ्याच्या मालाला यावेळेस चांगलाच फटका बसणार आहे
शेतकरी दिवस रात्र कष्ट करून या मातीत पिक पिकवतो परंतु अस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचे पीक चांगल्या प्रकारे पिकत नाही व त्यामुळे शेतकऱ्याला पिकलेल्या मालाला चागला भाव मिळत नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या