Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अभिजित देशमुख यांची सर्वानुमते निवड यंदाचा शिवजन्मोत्सव ठरणार ऐतिहासिक
औरंगाबाद दि.१६ औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीची बैठक शनिवार, दि. १५ जानेवारी रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा औरंगाबाद शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत २०२२-२०२३ च्या शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी अभिजित देशमुख यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.या महत्वपुर्ण बैठकीचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन राजेंद्र दाते पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजू शिंदे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी रोजी साजरी होत असून या निमित्ताने यंदाची ही शिवजयंती आरोग्याचा संकल्प करून मोठ्या थाटा-माटात  साजरी करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दिली. 
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवजयंती निमित्त गेली पाच दशके विविध उपक्रम राबविण्यात येतात. याही वर्षी विविध समाजोपयोगी उपक्रमांनी मोठया उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याचे अभिजित देशमुख म्हणाले. त्यांच्या या निवडी बद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा औरंगाबाद जिल्हा शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार, आ. सतीश चव्हाण, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,आ. प्रदीप जैस्वाल, आ.अंबादास दानवे, आ. संजय शिरसाठ, आ. विक्रम काळे, मा. आ. डॉ. कल्याण काळे, माजी आ. किशनचंद तनवाणी, मा. आ. सुभाष झांबड, विलास औताडे, यांनी अभिजित देशमुख यांचे अभिनंदन केले आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित देशमुख म्हणाले कि, यंदाच्या शिवजयंती मध्ये आरोग्यविषयक उपक्रमांचा समावेश असणार आहे.  यंदाचा शिवजयंती महोत्सव सोहळा ऐतिहासिक ठरणार असून तब्बल चार वर्षानंतर क्रांती चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शिवप्रेमींना दर्शन घेता येणार आहे. हा सोहळा औरंगाबादकरांच्या कायम स्मरणात राहील असा विश्वास यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला. 
            या बैठकीस पृथ्वीराज भाऊ पवार, माजी अध्यक्ष जगन्नाथ काळे, तनसुख झांबड,डी एन पाटील, राजू शिंदे, राजेंद्र दाते पाटील, अनिल मानकापे, मनोज पाटील, समीर राजूरकर, अभिषेक देशमुख, सुरेश वाकडे, संदीप शेळके, अनिकेत पवार यांची उपस्थिती होती. नूतन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिवजयंती महोत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या