Advertisement

Responsive Advertisement

डोगरगांव बिट जमादार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी.....राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे पोनी यांना दिले निवेदन


सिल्लोड प्रतिनिधी

सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील हद्दीत बेसुमार पणे अवैध धंदे सुरु असून हे सर्व अवैध धंदे डोंगरगाव बिट जमादार आगे यांच्या आशीर्वादाने सुरु असून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शेख अमान यांनी पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांना दिले. निवेदनात नमूद केले आहे की तालुक्यातील डोंगरगांव शिवारात राजरोस खुलेआम पणे अवैध तितली , सुरट , गुटखा , सट्टा , पत्ता , अवैध दारु , गांजा , ची खरेदी विक्री सदरील बिट जमादाराच्या अर्शीवादाने सुरु असून सदरील अवैध धंदे चालविणारे हे हफ्ते देऊन अवैध धंदे चालवीत असल्याचे निवेदनामध्ये नमूद करून गैर कायदेशीर धंदे चालवणा - यावर कोणाचाही धाक उरलेला नाही.त्यामुळे बिट जमादार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन डोंगरगाव शिवारातील अवैध धंदे पूर्ण पणे थाबवावे नसता राष्ट्रवादी युवक काँग्रच्या वतीने आपल्या कार्याल्या समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी,अक्षय पाटील युवक अध्यक्ष  अनिल राऊत युवक तालुका अध्यक्ष  ,पांडूरंग बडक आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या