Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद येथे मकरसंक्रांत उत्सवाला महिलांची गर्दी


दौलताबाद - तीळ गूळ घ्या गोड गोड बोला 
आमचे तीळ सांडू नका आमच्या शी भांडू नका
शुक्रवारी मकर संक्रांत सण उत्साहात साजरा
दौलताबाद अब्दीमंडी येथील रोकडे हनुमान मंदिरात मकरसंक्रांत उत्सवाला 
महिलांची गर्दी 
वाण म्हणून मातीचे सगडे या मध्ये शेतात जे नवीन पीक पिकते ते सर्व धान्य भरले जाते त्यात हरभरा, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीच्या ओंब्या, गाजर,बोर,ऊस आणि तीळ गूळ भरले जाते 
तीळा मध्ये स्निग्धता आणि गुळा मध्ये गोडवा असते 
म्हणून या महिन्यामध्ये शारीरिक दृष्टीने तिळी चे सेवन करणे अत्यंत लाभदायक असते 
संक्रांत हा सण एक संकल्प असा करा की आपल्या जीवनासाठी फायदेशीर ठरेल व जीवन सुधारेल व क्रांती होईल
     सीता सीता वाण घे रामाचे नाव सांगून दे असे महिला एक दुसऱ्या सांगत आपल्या पतीदेव चे नाव घेत होते
व आपल्या प्रत्येक जीवनात हेच पती मिळो व दीर्घ आयुष्य दे
अश्या प्रार्थना करत असताना दिसल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या