Advertisement

Responsive Advertisement

माँसाहेब मिनाताई ठाकरे यांना ममता दिनानिमित्त अभिवादन


औरंगाबाद : - तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे यांचा जन्मदिवस ६ जानेवारी हा ममता दिन म्हणुन साजरा केला जातो. शिवसेना संभाजीनगरच्या वतीने गुलमंडी येथे भावभक्ती गितांनी मॉसाहेब मिनाताई ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मॉसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या आठवणी सांगत स्मृतींना उजाळा दिला. आलाप प्रस्तुत सरला शिंदे व अभिजीत शिंदे यांच्या टिमने सुमधुर गायीलेल्या गितांनी गुलमंडी परिसर मंत्रमुग्ध होवुन गेला. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माऊली माऊली, शिवसेना गित, हंबरुन वासराले चाटती जव्हा गाय तव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय या गितांनी महिला वर्ग गहिरवरुन गेला. 
कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर ०मोजक्याच कार्यकत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास तिळगुळ वाटप, ब्लँकेट वाटप, मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, दिनदर्शिका वाटप, संक्रांन्त साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सौ. वैजयंती खैरे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, संतोष जेजूरकर, आनंद तांदूळवाडीकर, विधानसभासंघटक राजु वैद्य, गोपाल कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, महिला आघाडी जिल्हासमन्वयक कला ओझा, उपशहरप्रमुख हिरालाल सलामपुरे, अनिल जैस्वाल, मकरंद कुलकर्णी, जयसिंग होलिये, गणपत खरात, चंद्रकांत इंगळे, रतनकुमार साबळे, संदेश कवडे, सतिश कटकटे, विजय सुर्यवंशी, माजी नगरसेवक सचिन खैरे, विरभद्र गादगे, किशोर नागरे, मोहन मेघावाले, युवासेनेचे समन्वयक संदिप लिंगायत, अजय चोपडे, यश पागोरे, गिरीश तिवारी, संतोष जाटवे, विनोद बनकर, विनोद माने, बाळु वाघ, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक अंजली मांडवकर, जयश्री लुंगारे, नलिनी बाहेती, सुनंदा खरात, दुर्गा भाटी, विधानसभा संघटक मिरा देशपांडे, लक्ष्मी नरहिरे, शहरसंघटक प्राजक्ता राजपुत, विद्या अग्निहोत्री, उपशहरसंघटक सिमा गवळी, भागुबाई शिरसाट, अरुणा भाटी, सुषमा यादगिरे, राजश्री राणा, किरण शर्मा, माजी नगरसेविका सुनिता सोनवणे, पदमा शिंदे, शिवअंगणवाडी सेनेच्या मंजुषा नागरे, रुख्मणीबाई पवार, मिना पाटील, स्मिता जोशी, शोभा साबळे, अनिता खोंडकर, पुष्पा राजे, रेणुका जोशी, सपर्णा चिंतलवार, सुलोचना पगारे, गौरा जाटवे, बाळासाहेब गायकवाड, कृष्णा खडके, नरेश पूंड, अशोक पुंड, सुशांत डांबरे आदींसह शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडींची उपस्थिती होती. 

*पद्मश्री स्व. सिंधुताई सपकाळ यांना शिवसेनेच्या वतीने श्रध्दांजली*

लाखो अनाथांचा सांभाळ करणाऱ्या माई उर्फ सिंधुताई सपकाळ यांचे ४ जानेवारी रोजी निधन झाले. शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांना न विसरता त्यांनी अनेकदा हजेरी लावली. कार्यकत्र्यांनी ठेवलेल्या व्याख्यान असो वा महिलांचे कार्यक्रम या कार्यक्रमात त्या आवर्जुन उपस्थित राहात होत्या. त्यामुळे शिवसेना संभाजीनगरच्या वतीने गुलमंडी येथे त्यांना श्रध्दांजली वाहन्यात आली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी माईच्या सामाजिक कार्यक्रमाचे महिलांनी दखल घ्यावी व त्यांचे विचार आणि वारस पुढे अविरत चालु ठेवावा.

*वैजयंती खैरे यांच्या वतीने २०० ब्लँकेटचे वाटप*

माँसाहेब मिनाताई ठाकरे यांची जयंती म्हणजेच ममतादिनानिमित्त गरजु व कष्टकरी महिलांना २०० ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी थंडीचा कडाका वाढल्याने अनेक गरजुंना शिवसेनेच्या मदतीने मायेची ऊब मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचे आभार मानले. 

*उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन*

युवासेना उपसचिव तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी इंग्रजी नववर्षानिमित्त दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. या दिनदर्शिकेचे आज ममता दिनानिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे  व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित प्रकाशन करण्यात आले व शहरातील नागरीकांना मोफत वाटप करण्यात आले. 


*रतन साबळे यांच्यावतीने तिळगुळ व बँगचे वाटप*
शिवसेना उपशहरप्रमुख रतनकुमार साबळे हे गेल्या २० वर्षापासुन संक्राती निमित्त दरवर्षी कापडी पिशवी व तिळगुळ साहित्य वाटप करतात. आज ममता दिनानिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या