Advertisement

Responsive Advertisement

ढोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळण्याची भिती


गंगापुर -
ढोरेगाव (ता. गंगापूर) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली असून संपूर्ण इमारत ही शेवटच्या घटका मोजत आहे. जीर्ण झालेल्या इमारतीच्या भिंतीला सर्वत्र मोठे तडे गेल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.सदरील वर्ग खोल्यांमध्ये शाळा भरवून विद्यार्थ्यांना बसवणे जोखमीचे व धोकेदायक बनले असून पुढाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा याकडे कानाडोळा राहिला आहे.जीर्ण व मोडकळीला आलेलि संपूर्ण इमारत पाडण्यास जिल्हा परिषद औरंगाबादच्या सर्वसाधारण सभेने तब्बल ५ वर्षापूर्वी ठराव घेत मान्यता दिलेली आहे.मात्र १७ जुलै २०१७ पासून आजपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ कुंभकर्णी झोप घेतली आहे.यावर कुठलीही ठोस भूमिका न घेता कृतिशून्य अवस्था आहे.नवीन शाळा इमारत बांधण्याबाबत जिल्हा परिषदेकडे वारंवार लेखी पत्रव्यवहार केलेला आहे.जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव शाळेची स्थापना २२ नोव्हेंबर १९६२ ची असून ही शाळा बीटशाळा,केंद्रशाळा, समूहकेंद्र असून आजमितीला या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असून एकूण २८१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली ते सातवीच्या प्रत्येक वर्गास एक अशा ७ वर्गखोल्या,बीट,केंद्रशाळा,समूहकेंद्र,  मुख्याध्यापक कार्यालय,वाचनालय,संगणक लॅब,किचनशेड,यासाठी ७ वर्गखोल्या असे एकूण मिळून दुमजली इमारतीत खालीवर मिळून १४ वर्गखोल्या मुलांमुलींसाठी अद्ययावत स्वच्छतागृहासह नव्याने बांधून देण्यात याव्यात.तसेच त्याला संरक्षण भिंतीचे कवच उभारण्यात यावे.जेणेकरून शिक्षण हक्क कायद्यान्वये बालकांचे शिकणे सुकर होईल.संपूर्ण इमारतच त्वरित नव्याने बांधून देण्यात यावी.तसेच त्याला संरक्षण भिंतीचे कवच उभारण्यात यावे अन्यथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल,सरपंच दिलीप कांबळे,उपसरपंच अलीम शेख,विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन काकासाहेब पठाडे,माजी सरपंच सुमनबाई जोशी आदींनी याविषयी सनदशीर मार्गाने लढा उभारत रस्त्यावर उतरण्याचा गांभीर्यपुर्वक इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या