Advertisement

Responsive Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातंर्गत होणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता लघुलेखक पदाचा अनुभव हा पर्यवेक्षी प्रशासकीय अनुभव म्हणून ग्राह्य धरावा- क्रांतीसेनेची मागणी


राहुरी : लघुलेखक हे पद शासकीय कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक यांच्या वेतन श्रेणीनुसार समकक्षेत येत आहे. त्यामुळे लघुलेखक या पदाचा अनुभव हा पर्यवेक्षी प्रशासकीय अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविलेल्या ई- निवेदनात केली आहे.

पाठविण्यात आलेल्या ई निवेदनात म्हटले आहे की, सर्व शासकीय कार्यालयामध्ये लघुलेखक पदे मंजूर असून सदरचे पदे हे काही कार्यालयामध्ये वर्ग 2 गट ब काही कार्यालयामध्ये वर्ग 3 गट - क मध्ये येत आहे. तसेच लघुलेखक हे पद काही शासकीय कार्यालयामध्ये तांत्रिक व काही कार्यालयामध्ये अतांत्रिक (लिपीकवर्गीय) आहे. परंतु सदरच्या पदाचा अनुभव हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातंर्गत होणाऱ्या स्पर्धापरीक्षा सरळसेवा परीक्षेकरीता पर्यवेक्षी प्रशासकीय अनुभव म्हणून ग्राह्य धरला जात नाही. परंतु लघुलेखकाचे कामकाज प्रशासनातील वर्ग-१ अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कर्तव्य बजावत असताना सदरच्या पदाकडून प्रशासनातील इतर पर्यवेक्षीसंबंधीत कामकाज करून घेतले जातात. 

लघुलेखक हे पद शासकीय कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक यांच्या वेतन श्रेणीनुसार समकक्षेत येत आहे. जेणेकरून लघुलेखक या पदावरील उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातंर्गत होणाऱ्या स्पर्धा परीक्षा / सरळसेवा परीक्षेकरिता पात्र होऊन कार्यक्षम उमेदवार मिळतील. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातंर्गत होणाऱ्या स्पर्धा परीक्षा / सरळसेवा परिक्षेकरीता लघुलेखक पदाचा अनुभव हा पर्यवेक्षी प्रशासकीय अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन राज्यपाल, उपमुख्यमंत्री, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री, मुख्य सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, अहमदनगर जिल्हाधिकारी आदींना पाठविण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या