Advertisement

Responsive Advertisement

साप्ताहिक मंत्री मंडळ बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या मंजूर करा-राजेंद्र दाते पाटील


मुंबई (प्रतिनिधी) २०१४ पासुन मराठा समाजातील युवक शासनाच्या विविध विभागात नौकरी साठी पात्र ठरलेली असुन बहुसंख्य  उमेदवार युवकांची निवड अंतिम होऊन कागदपत्रे सुद्धा तपासणी झालेली असून शासनाने या उमेदवारांना त्यांचा वर्ग बदलण्याची परवानगी सुद्धा दिलेली असुन त्या प्रमाणे आता त्या समस्त उमेदवारांन खास बाब म्हणुन राज्य सरकारने नियमात बसवून नियुक्ती पत्र निवड झालेल्या तारखे पासून देण्याचे काही ना काही कारणांमुळे प्रलंबित असुन   त्यामुळे मराठा समाजा मध्ये अस्वस्थता निर्माण होऊन नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
म्हणून साप्ताहिक मंत्री मंडळ बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या मंजूर करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी १४मार्च रोजी केली होती व त्यावर प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी हे निवेदन मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचीव सुजाता सौनिक यांचेकडे पाठवले आहे.
आपल्या महत्वपुर्ण निवेदनात त्यांनी राज्य शासनाच्या अखत्यारीत व अधिकारात असलेल्या मराठा समाजाच्या मागण्या केल्या असुन त्यात नमुद केले होते की,या बाबत अनेक शासकीय बैठका मध्ये आम्हांस निमंत्रीत करण्यात आले होते  व बैठकीत आम्ही सर्व प्रकारचे कायदेशीर पुरावे लेखी सादर केलेला होते व त्यामुळे शासनास कायदेशीर दृष्टिकोनातुन संपूर्ण समाधान सुद्धा झालेले आहे.
   मराठा समाजाचा प्रचंड आक्रोश पहाता कागदपत्रांची पडताळणी होऊन अंतिम निवड झालेल्या २०१४ ते २०१९-२० पर्यंतच्या विविध मुख्यशासकीय विभागातील  सर्वच उमेदवारांना तात्काळ सेवेत सामावून घेणे साठी व नियुक्ती पत्र देण्यासाठी साप्ताहिक मंत्री मंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय करावा आणि हा निर्णय करतांना तत्कालीन खासदार सुदर्शन नचीप्पन्न समितीचा  आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची शिफारस असलेल्या प्रलंबीत संसदेतील बिलाच्या मंजुरी साठी केंद्र सरकार कडे अति तातकाळ पाठवुन  सर्वपक्षीय  पाठपुरावा करावा, २०१४ ते २०१९- २०२० पर्यंत निवड होऊन पात्र ठरलेल्या सर्वच आणि विविध विभागातील  उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र देण्याचा निर्णय साप्ताहिक मंत्री मंडळात त्वरीत घ्यावा तसेच आईच्या जातीचे प्रमाणपत्र तिच्या पाल्यानां लागु करण्यांचा/देण्याचा तथा वापरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होऊन संबंधितांना तसे आदेश व्हावेत ही महत्वपुर्ण मागणी मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्र्यां कडे केल्या नंतर त्यांनी तात्काळ सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचीव सुजाता सौनिक यांचेकडे पाठवले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या