Advertisement

Responsive Advertisement

गुलमंडी येथे हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त शिवसेना उभारणार गुढी

औरंगाबाद दि. ३१ – दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हिंदु नववर्षानिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे ह्रदयस्थान गुलमंडी चौकात हिंदू नववर्षनिमित्ताने शिवसेना भव्य गुढी उभारुन गुढीपाडवा व हिंदु नववर्ष साजरा करण्यात येणार आहे.
          शनिवार, २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्य हस्ते ध्वजारोहण करुन गुढी उभारण्यात येणार आहे. यावेळी सहसंपर्कप्रमुख त्रिंबक तुपे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख आमदार प्रदिप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडु ओक, आनंद तांदूळवाडीकर, गणू पांडेय, अनिल पोलकर,संतोष जेजुरकर, राजेंद्र राठोड, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपळ कुलकर्णी, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ,ऋषिकेश खैरे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, कॉलेज कक्षचे ऋषिकेश जैस्वाल, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा समन्यवक कला ओझा, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हा संघटक अंजली मांडवकर, अनिता मंत्री, नलिनी बाहेती, जयश्री लुंगारे, मीना फसाटे, दुर्गा भाटी, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, लक्ष्मी नरहिरे, शहर संघटक भागूबाई शिरसाठ, प्राजक्ता राजपूत, विद्या अग्निहोत्री, आशा दातार आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या प्रसंगी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना, पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना संभाजीनगर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या