Advertisement

Responsive Advertisement

गोरगरीब व गरजू जनतेला मिळणार घर; खासदार जलील यांनी करून दाखवलऔरंगाबाद : औरंगाबादेतील गरजु व गोरगरीब नागरीकांना रखडलेल्या पंतप्रधान आवास योजनेतुन हक्काचे घर मिळावे म्हणून खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र शासनाच्या विरोधात कठोर भुमिका घेवुन थेट लोकसभेत प्रश्न उपस्थित करुन केंद्रीय अर्बन डेव्हलपमेंट समितीच्या बैठकीत तक्रार केली होती. थेट केंद्रात तक्रार झाल्याने व शहरात घरकुल विरोधाचे बॅनर झळकविल्याने जिल्हा प्रशासनाने रातोरात घरकुल योजनेसाठी विविध ठिकाणी जागा उपलब्ध करुन युध्दपातळीवर डिपीआर तयार करुन राज्य शासनाच्या मंजुरीसह केंद्राकडे पाठविला होता; खासदार इम्तियाज जलील यानी यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे आणि गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काचे घर मिळावे म्हणून कठोर भुमिका घेत सर्व स्तरावर आपली भूमिकेवर ठाम असल्याने अखेर आज महानगर पालिकेने सादर केलेल्या घरकुल डिपीआरला केंद्र शासनाने मंजुरी दिली. घर मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरीकांना आता त्यांच्या स्वत:चे हक्काचे घर लवकरच मिळणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
           खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय गृह निर्माण मंत्री हरदिप सिंग पुरी आणि अर्बन डेव्हलपमेंटचे सचिव मनोज जोशी यांची आज दिल्ली येथे भेट घेवून औरंगाबाद महानगरपालिकेने सादर केलेल्या डिपीआरला मंजुरी देण्याची विनंती केल्याने, दिनांक ३० मार्च रोजी औरंगाबाद घरकुल योजनेच्या डिपीआरला मंजुरी देण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यानी कालच सांगितले होते.
           थेट लोकसभेत मुद्दा उपस्थित करुन मा.पंतप्रधान यांना ३१ मार्च २०२२ ला मुदत संपत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा विशेष बाब म्हणून दोन वर्षा करिता कार्यकाळ वाढवून देण्याची दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ ला पत्राव्दारे विनंती करण्यात आल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या