Advertisement

Responsive Advertisement

शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्तांना निवेदन

हिंदू नववर्ष गुढीपाडवा शोभायात्रेस परवानगी द्या


औरंगाबाद:- येत्या शनिवारी २ एप्रिल रोजी हिंदू नववर्ष समितीतर्फे गुढीपाडवा निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात येते. १७ वर्षांची परंपरा मध्यंतरी कोरोनामुळे २ वर्षे स्थगित केली होती. मात्र यावर्षी हिंदू नववर्ष गुढीपाडवा शोभायात्रेस परवानगी द्यावी. अशी मागणी संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख तथा आमदार आंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, आनंद तांदूळवाडीकर, गणू पांडेय, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, उपशहरप्रमुख जयसिंह होलीये, नारायण कानकाटे, शेख अतिक आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी वरिष्ठांना निवेदन पाठवत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी शिवसेना शिष्टमंडळाला दिली.
 सुनील खडके
शिवसेना प्रसिद्धीप्रमुख
९७६४८०००११

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या