Advertisement

Responsive Advertisement

शिवाजी महाराजांचे विचार बाबासाहेबांनी राज्यघटनेत मांडले - श्रीमंत कोकाटे यांचे प्रतिपादन

औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा फुले-भीमोत्सव सप्ताह 
औरंगाबाद-:औरंगाबाद येथील शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने फुले-भीमोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्रीमंत कोकाटे यांनी आज आपल्या व्याख्यानात सांगितले की,छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे, म्हणजेच जनतेचे राजे होते, समता व ऐक्याचे राज्य शिवाजी महाराज यांनी निर्माण केले, शिवाजी महाराजांचे विचार बाबासाहेबांनी राज्यघटनेत मांडले असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत व इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे लोककल्याणकारी राज्य व भारतीय राज्यघटना याविषयावर श्रीमंत कोकाटे यांनी आपले विचार मांडले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने फुले-भीमोत्सवाचे 7 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, याप्रसंगी उदघाटक म्हणून उत्तमसिंह पवार होते,तर अध्यक्ष हिशाम उस्मानी होते, ऍड. इकबालसिंह गिल,सागर नागरे, रेखा राऊत, वैशाली तायडे व विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती, पुढे बोलताना श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले की,छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही मुस्लिम द्वेषी नव्हते, तर शिवाजी महाराज यांनी कायम राज्याचे, महिलांचे व अल्पसंख्याक, दुर्लक्षित घटकांचे संरक्षण केले, शिवाजी महाराजांचे राज्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना जर नसती तर आज आपला देश व आपण सुरक्षित नसतो, आजच्या स्त्रियांचा विकास व सामाजिक परिवर्तन हे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे दिसत आहे,असेही कोकाटे यांनी यावेळी सांगितले.मुख्य संयोजक डॉ. अरूण  शिरसाट यांनी प्रास्ताविक केले, पाहुण्यांचा परिचय डॉ. बाळासाहेब अंभोरे यांनी केला,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मिलिंद आठवले तर आभार प्रदर्शन ऍड. संतोष लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाला औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे  किशोर सरोदे प्रा.शिलवंत गोपणारायन, मुजफ्फर अली, अशोक चक्रे, सलमान सय्यद, शिरीष चव्हाण,विजया भोसले, उत्तम दनके, शकुंतला साबळे, साहेबराव त्रिभवन,संदीप बोरगे, हमीद भाई, विशाल बनस्वाल, आनंद दाभाडे, चक्रधर मगरे, विलास पांडे, प्रकाश वाघमारे, प्रा. रमेश वाघ,विजय पटेकर,स्वप्नील रोडगे, शीला मगरे, मंजू लोखंडे, चंद्रप्रभा खंडारे, कोमल खरात, रंजना हिवाळे, सविता इंगळे, धम्मज्योति ताई, ताराबाई सुरडकर, शांता बाई बनकर, डोंगरे ताई,आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या