Advertisement

Responsive Advertisement

एस.बी.आय. बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या मग्रूर पणामुळे ग्राहक वैतागले

{ मायक्रो फायनान्ससह इतर बँकांचा शोधू लागले पर्याय!}

धर्माबाद- राष्ट्रीयकृत असलेल्या धर्माबादच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या मग्रूर पणामुळे ग्राहक पार वैतागले असून कुठलेही कामे वेळेवर होत नसल्यामुळे आता मायक्रोफायनान्स इतर बँकेचा पर्याय ग्राहक शोधू लागल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
      ग्राहकाचे परमोच्च समाधान ही बँकेच्या कर्मचाऱ्यांची भूमिका असली पाहिजे. पण बँकेतील कर्मचारी एवढे मुजोर झालेत की ग्राहकांना ते काय सांगतील, कोणत्या भाषेत बोलतील, त्यांचे शारीरिक हावभाव या सततच्या व्यवहारामुळे ग्राहकांचे पार डोके सरकत असून संतापाच्या तीव्र प्रतिक्रिया ग्राहकांमधून उमटत आहेत.
खरेतर स्टेट बँक ऑफ इंडिया ही नामांकित राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेत स्टेट बँक ऑफ हैदराबादचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे सदरील बँकेचे ग्राहक दुप्पट झाले आहेत. पण कर्मचारी व काऊंटरची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचे आर.टी. जी. एस. म्हणजेच रियल टाइम ग्रास सेटलमेंट आणि याच धर्तीवर असलेले एन. एफ. टी. म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर या गोष्टीसाठी ग्राहकांना अतोनात त्रास होत आहे. खरेतर बँकिंग व्यवहारात उपरोक्त दोन्ही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असून शीघ्र व्यवहारासाठी उपरोक्त दोन्ही योजना व्यापारी ग्राहक यांच्या साठी महत्त्वाचे आहेत. पण सदरील योजनेद्वारे पैशाचे आर्थिक देवाण-घेवाणच्या बाबतीत या कर्मचाऱ्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसुन सदरील स्लिप भरून डब्यात टाकावे लागत आहेत. व ते कधी गहाळ होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे परत परत ग्राहकांना रांगेत ताटकळत उभा राहून पुन्हा त्याच त्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
क्राप लोन असो किंवा मुद्रा लोन असो यासंदर्भातही बँकेचे ध्येयधोरणे समाधानकारक नाहीत. वसुली व रिनिव्हल या गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नवीन खाते उघडणे व एटीएम कार्ड मिळवणे हे आता बंधनकारक झाले असून बँक या गोष्टीलाही म्हणावा तसा प्रतिसाद देत नाही.
स्टेट बँक ऑफ हैदराबादचे विलीनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झाल्यामुळे बरेच खातेदार दोन वर्षापासून स्टेट बँक ऑफ इंडियाचे पासबुक मिळावे यासाठी चकरा मारत असून त्यांना नाहक त्रास सदरील कर्मचाऱ्यांकडून मिळत असल्याचेही प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
उपरोक्त पार्श्वभूमीवर ग्राहक एवढे वैतागले आहेत की त्यांनी आता इतर बँकेचा पर्याय शोधू लागले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सदरील समस्या महाराष्ट्रव्यापी असल्या पाहिजेत. पण त्यावर उपाययोजना कोन करावी हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
*चौकट* संपूर्ण घटनाचक्र पाहता आता मोबाईल बँकिंग ही काळाची गरज होऊन बसल्याचे चित्र दिसत असून त्या दिशेने वाटचाल करणे हे ग्राहकांचं कर्तव्यच अशा प्रतिक्रिया प्रसिद्ध व्यापारी संतोष कुमार लुहाडे यांनी दिल्या.
*चौकट* धर्माबादचे रहिवासी असलेली सदरील बँकेचे कर्मचारी पल्लवी कामिनवार यांच्या अरेरावी बद्दल तर ग्राहक एवढे वैतागले आहेत की सदरील महिला कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली व्हावी अशी मागणी जोर धरत आहेत.
*चौकट* उपरोक्त बँकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे आता मायक्रो फायनान्सने तोंड वर काढले असून मायक्रो फायनान्स कंपन्याचे जाळे शहरासह संपूर्ण तालुक्यात गल्लीबोळात विणल्या जात असल्याचे चित्र दिसत असून त्यांच्याकडून थोडाफार व्याज जास्त असला तरी व्यवहार अगदी वेळेवर होत असल्यामुळे ग्राहक मायक्रो फायनान्स कंपन्या कडे वळले असून ही राष्ट्रीयकृत बँकांसाठी एक शोकांतिकाच ठरत आहे!..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या