Advertisement

Responsive Advertisement

तरूणांनी उद्योगाकडे वळावे प्रा. आ रमेश बोरनारे याचे प्रतिपादन

शांताराम मगर प्रतिनिधी लोणी खुर्द 

वैजापुर - तालुक्यातील मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या तलवाडा येथे केंद्रीय अर्थ मंञी भागवतजी कराड साहेब यांच्या संकल्पनेतून आमदार प्रा रमेश बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली डोंगरथडी सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना लघुउद्योग उभारणीसाठी पवनकुमार काबरा व आण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक समाधान सुर्यवंशी यानी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.कु.ऊ.बा.सभापती भागीनाथ मगर यांनी संस्थेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार मिळणार असल्याचे भागिनाथ मगर यांनी सागितले.
यावेळी बोलतांना प्रा रमेश बोरणारे म्हणाले आज विविध क्षेत्रात नोकरया नाहीत पुढील काळात बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी व स्वावलंबी बनण्यासाठी तरूणांनी उदयोगाकडे वळावे असे आवाहन आमदार रमेश बोरनारे यांनी केले . तलवाडा येथे आयोजित सुक्षिशीत बेरोजगार मार्गदर्शन मेळावा प्रसंगी त्यानी मार्गदर्शन केले .डोगरथडी सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेने केंद्रीय अर्थमंत्री डाॅ.भागवत कराड यांच्या मार्गदर्नाखाली या मेळाव्याचे आयोजन केले होते पुढे बोलतांना बोरणारे म्हणाले कुठलाही उद्योग व्यवसाय छोटा नसतो तसेच उद्योग व्यवसाय फकत शासनाची सबसिडी लाटण्यासाठी करू नका तर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन यशस्वी व्यवसाय उभा करून ग्रामीण भागातील इतरही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असे आवाहन त्यानी केले .जिल्हा संसाधन व्यक्ती पवनकुमार काबरा यांनी ग्रामीण भागातील तरूणांना मका प्रकिया, कांदा प्रकिया उद्योग यांविषयी सविस्तर माहीती देऊन शासनाच्या योजनेविषयी माहीती दिली. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून जिल्हा समन्वयक समाधान सुर्यवंशी यांनी जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत विविध योजना व व्याज परतावा यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले . कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर यांनी गावात बेरोजगार संस्थेच्या माध्यमातून तरूणांना रोजगार उपलब्ध करून देऊन सुक्ष्म, लघु, व मोठे उद्योग कसे उभारता येतील यात येणार्या अडचणी केंद्र सरकार व राज्य सरकार यांची लागणारी मदत यावर प्रकाश टाकत तलवाडा गावात उद्योग व्यवसाय उभारून एक औद्योगिक विकासाच माॅडेल तलवाडा गावात कसा उभारून तालुकयात आदर्श घालुन देता येईल याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी दादाभाऊ मगर  शांताराम मगर रवी मगर यांनी संस्थेविषयी माहिती व पुढील वाटचाल याबाबत विचार मांडले.यावेळी चेअरमन विनोद मगर.जनार्दन मगर.रामदास मगर.सोपान मगर बाबासाहेब मगर संतोष सुर्यवंशी राजेन्द्र मगर दत्तु मगर वसंत मगर काकासाहेब मगर प्रकाश सोनवणे कैलास पवार गजानन मगर बाळु घायवट याच्यासह गावातील तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब पवार यांनी केले आभार  ज्ञानेश्वर रोकडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या