Advertisement

Responsive Advertisement

नायगांव शहरात मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

*

नायगांव/प्रतिनिधी

नायगांव बाजार ) नायगांव शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे रस्त्यातच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी एका पत्रकाद्वारे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे,  शहरातील मुख्य रस्त्या असलेल्या राजुरा श्री हनुमान मंदिर पासून ते सराफा, मार्केट व डॉ. हेडगेवार चौक,ते छत्रपती शिवाजी महाराज चौक सह शहरात विविध ठिकाणी रस्त्यावरच अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून त्यातल्या त्यात नागरिकांना ना-हक त्रासला सामोर जावे लागत आहे, जेणेकरून शहरांसह शहरातील मुख्य असलेले डॉ. हेडगेवार चौक याठिकाणी अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केल्याने असंख्य वयोवृद्ध, शालेय विद्यार्थी, नागरिकांना,जाणे-येणे मुश्‍किल झाले आहे, कायदेशीर चौकशी करून शहरातील डॉ. हेडगेवार चौक सह विविध ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम- अतिक्रमण त्वरित हटवून असंख्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी आग्रही अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांनी जिल्ह्याधिकारी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, तहसीलदार ,सार्वजनिक बांधकाम उपविभाग-  उपअभियंता यांच्याकडे केली आहे, सदरील संदर्भांत नायगांव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक साहेब यांच्याकडेही एका लेखी पञाद्वारे कळविण्यात आले आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या