Advertisement

Responsive Advertisement

पंतप्रधानांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थानांच्या सर्वांगिण विकासासाठी १०० कोटीचे विशेष पॅकेज द्यावे – खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी स्थापन केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मिलिंद कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड साईन्स, डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स अ‍ॅण्ड आर्टस् कॉलेज, पीईएस पॉलिटेक्निक अ‍ॅण्ड इंजिनिअरींग कॉलेज, पीईएस फिजिकल एज्युकेशन कॉलेज (बीपीएड), मिलिंद मल्टीपर्पज हायस्कुल व महाविद्यालय यांच्या सर्वांगिण विकास होण्यासाठी, मूलभूत व पायाभूत सुविधांचे बळकटीकरण तसेच समस्त विद्यार्थ्याना व संशोधकांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे याकरिता १०० कोटींचे विशेष पॅकेज घोषित करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
          पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात खासदार इम्तियाज जलील यांनी नमुद केले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आधुनिक शिक्षणापासून कोणीही वंचित राहु नये म्हणुन बौध्द लेणीच्या पायथ्याशी नयनरम्य व जैव विविधता असलेल्या परिसरात एक मोठे शिक्षण ज्ञानकेंद्र उभारलेले आहे. गुणवत्ता व सामाजिक बांधिलकी हे ब्रिद जोपासतांनाच राष्ट्र निर्मितीत योगदान देणारे विद्यार्थी, संशोधक येथून घडलेले आहेत. शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेपासूनच अतिशय चांगले असे शैक्षणिक वातावरण येथे आहे. सबब विद्यापीठ व शैक्षणिक संस्थानात अतिशय महत्वपूर्ण असे ज्ञानदानाचे कार्य प्रामाणिकपणे केले जात आहे.
          शिक्षण, संशोधन, विस्तार आणि सेवा या चतु:सुत्रीचा अवलंब विद्यापीठाने केलेला आहे. विविध विद्याशाखांतर्गत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, स्पर्धात्मक परिक्षा व प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरु केलेले आहेत. श्रमप्रतिष्ठेला महत्व देवुन विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान व स्वयंनिर्भरता या हेतून विद्यापीठ स्तरावर महत्वपुर्ण असे कल्याणकारी योजना राबविले जातात.  
          विद्यार्थ्यांना, संशोधकांना जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी शैक्षणिक संस्था व विद्यापीठ प्रशासन अनेक विभागाच्या नवीन इमारती उभारुन रस्ते, पाणी-पुरवठा, विद्युतीकरण यांच्यासह इतर मुलभुत सुविधा देण्यासाठी सतत प्रयत्नशिल असते. याबरोबरच या परिसरात विविध भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुध्दा उभारलेली असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या