Advertisement

Responsive Advertisement

बाळापूर भीम जयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर.....


धर्माबाद :- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या १३१ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बाळापूर येथील सार्वजनिक भिमजयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नवनिर्वाचित जयंती मंडळाचे अध्यक्ष म्हणून उच्चशिक्षित, नवतरुण शुकलोधन पहेलवान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी चंद्रभीम हौजेकर व आकाश झुंजारे यांची निवड करण्यात आली आहे. त्यासोबतच इतर कार्यकारिणीही गठित करण्यात आली असून, सचिव पदी साहेबराव सोनकांबळे, कोषाध्यक्ष पदी चंद्रकांत घाटे यांची निवड करण्यात आली आहे.
        गत दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्वच सण उत्सवांवर निर्बंध आले होते, त्यामुळे जयंती सुद्धा उत्साहात साजरी करता आली नव्हती. मात्र नुकतेच मुख्यमंत्र्यांनी सर्व सण उत्सव उत्साहात साजरे करण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार उत्साहात व शांततेत जयंती साजरी करावी असे आवाहन नूतन अध्यक्ष शुक्लोधन पहेलवान यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या