Advertisement

Responsive Advertisement

महालक्ष्मी महिला विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

इचलकरंजी -  राज्यातील नृत्य स्पर्धकांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नृत्यदिग्दर्शिका दीपा पुजारी यांच्या संकल्पनेतून महालक्ष्मी महिला विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
   सदर कार्यक्रम रविवार दिनांक २४ एप्रिल,२०२२ रोजी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात स्पर्धेचा थरार रंगणार असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. दीपा पुजारी यांनी दिली आहे.महाराष्ट्राची लोकधारा म्हणून लावणी ओळखली जाते. ही लोकधारा रुजावी, वाढावी यासाठी "महालक्ष्मी महिला विकास संस्थे" च्यावतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही नृत्य स्पर्धा तीन गटात घेतली जाणार असून पहिल्या गटात ५ ते १५ वर्षे,दुसऱ्या पुरुष लावणी गटात  १५ ते ५० वर्षे तर तिसऱ्या लावण्यसम्राज्ञी गटात १५ ते ५० वर्षे यांचा समावेश आहे. विजेत्यांना भरघोस रक्कमे बरोबरच शिल्ड, पारितोषिके देण्यात येणार आहेत. 
   या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या स्पर्धकांनी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी सौ.दीपा पुजारी ८७९६१८२५२३  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या