Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद येथूनच जवळ असलेल्या करोडी येथे शंकर पटाचे आयोजन

दौलताबाद- येथूनच जवळ असलेल्या करोडी  येथे शंकर पटाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.
या शंकर पटात औरंगाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कान्याकोपर्यातून दिडशेच्या जवळपास बैल जोडयानी सहभाग घेतला.सर्वोच्च न्यायालयाकडून शर्यतीला परवानगी मिळाल्याने सर्जा राजा वर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांचा शंकर पट सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले आहे.शंकर पट हा ग्रामीण भागाचा एक मनोरंजनाचा भाग म्हणून ओळखला जात होता परंतु त्यावर बंदी आल्याने शेतकऱ्यां मध्ये नाराजी होती, याचा परिणामी बैलांची ही संख्या रोडावल्या गेली असल्याचे बोलले जात होते,परंतु आता परत शंकरपट नव्याने सुरू झाल्याने ग्रामीण भागात उत्साह बघायला मिळत आहे.याच उत्साहातून माजी पंचायत समिती सदस्य सर्जेराव चव्हाण यांनी शनिवारी(ता.दोन) करोडी ता.औरंगाबाद येथील भांगशी माता गडाच्या पायथ्याशी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते या पटात संपूर्ण महाराष्ट्रातून बैल जोड्या या ठिकाणी शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी आल्या होत्या यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र,खान्देश, व विदर्भातून अश्या दिडशेच्या वर बैलजोड्या या शंकर पटात सहभागी झाल्याचे संयोजकांनी यावेळी सांगितले,ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये चैतन्य व विधायक कार्याची स्पर्धा निर्माण व्हावी या भावनेतून स्वर्गीय विश्वनाथराव पाटील चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शंकर पटाचे आयोजन करोडि येथे केले होते.यावेळी विजेत्या जोडीला प्रथम पारितोषिक 31हजार हे सर्जेराव चव्हाण यांच्या वतीने तर द्वितीय पारितोषिक 21 हजार प्रकाश पाटील गडगूळ यांच्या वतीने व तृतीय पारितोषिक 15 हजार हे सूर्यभान जाधव यांच्या वतीने देण्यात आले.ही बैलांची शर्यत पाहण्यासाठी जिल्ह्यातील व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या