Advertisement

Responsive Advertisement

राजकिय पक्षांनी पक्षाच्या नावाने रुग्णालय(हॉस्पिटल) सुरू करावे , कल्पतरु संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजी गायकवाड यांची मागणी. औरंगाबाद- आज समाजातील शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार,  गरजू व गरीब कुटुंबातील सदस्य यांना आजही चांगल्या प्रकारे व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकलेली नाही, अनेक गरीब रुग्णांना महागड्या उपचार पद्धती मुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ग्रामीण भागातील सरकारी दवाखाने कार्यरत असूनही आधुनिक तंत्रज्ञान असलेले यंत्रसामुग्री  येथे उपलब्ध नसल्याने रुग्णांना शहरात उपचारासाठी यावे लागते, यातून वेळ व पैसा खर्च होतो. अनेक दिवसांपासून कमावलेली तुटपुंजी रक्कम खर्च झाल्यामुळे कुटुंब कर्जबाजारी होते. जनतेसमोर दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी अनेक समस्या निर्माण  झाल्या असतांना, " दुष्काळात 13 तेरावा महिना" या म्हणीप्रमाणे आजारपणाला , आरोग्य सेवेला,  सामोरे जावे लागत आहे.  
         या घडीला देशात अनेक राजकीय पक्ष कार्यरत आहे,त्यापैकी काही राष्ट्रीय पक्ष तर काही प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत आहेत. राजकीय पक्षांना अनेक मार्गाने पक्ष निधी म्हणून देणगी मिळते. पक्षातही अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक,तसेच समाजातील अनेक कार्यकर्ते काम करत असतात. आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदार संघातील जनतेसाठी आरोग्य सेवा देण्यासाठी निधी असतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने  मंत्रालयात " मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष"  स्थापण करून अत्यावश्यक रुग्णांना लाभ मिळवून दिला जातो. धर्मादाय कार्यालय अंतर्गत अनेक रुग्णालयात गरीब गरजू रुग्णावर उपचार केले जातात. शासकीय रुग्णालयात लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते, यांची एक समिती स्थापन करून रुग्णांना मदत केली जाते. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य जीवनदायी योजना, अशा अनेक शासकीय योजनेच्या माध्यमातून  शासन, सरकार, जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून देत असते. असे असूनही  वैद्यकीय सेवेअभावी अनेक रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळत नाही, अनेक कटुंब या कारणाने रस्त्यावर आले आहे.
         अशा परिस्थितीमध्ये राजकिय पक्षांनी जसे आपले सुसज्ज कार्यालय प्रत्येक शहरात सुरू केले आहे, त्याच पद्धतीने जर पक्षाच्या नावाने,  पक्षाच्या नेत्यांच्या नावाने, किंवा महापुरुषांच्या नावाने सुसज्ज असे हॉस्पिटल सुरू केले तर या हॉस्पिटलमध्ये पक्षातील गरजू कार्यकर्ते, सामान्य कुटुंबातील सदस्य, शेतकरी, शेतमजूर, असे अनेक रुग्ण येथे उपचार घेऊ शकतात. असे प्रत्येक पक्षाने शहरात किंवा ग्रामीण भागात हॉस्पिटल सुरू केले तर " रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा" या उक्तीप्रमाणे रुग्णांची सेवा केली जाईल. प्रत्येक पक्षातील नेते मंडळी आपल्या पक्षाची भूमिका किंवा जाहीरनामा मांडत असतांना सांगत असतात की आम्ही 80% टक्के समाजकारण व 20% टक्के राजकारण करतो, हे जर सत्य असेल तर 80%टक्के समाजकारणात  प्रत्येक पक्षाने शहरी व ग्रामीण भागातील जनतेसाठी हॉस्पिटल सुरू केले पाहिजे, पक्षाने ठरवले तर हे काम अगदी सहजपणे ते सुरू करू शकतात व त्यांनी सुरू करावे अशी मागणी कल्पतरू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजी गायकवाड दरेगाव ता. खुलताबाद जि. औरंगाबाद  हे  सर्वच राजकीय पक्षांचे पक्षप्रमुख तसेच नेते मंडळींना निवेदनाद्वारे  करणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या