Advertisement

Responsive Advertisement

पिशोर सरपंच पदी बाळासाहेब जाधव..


पिशोर-येथील ग्राम पंचायतच्या सरपंच सौ. सरलाताई डहाके या प्रस्तुति रजेवर गेल्याने प्रशासन वतीने ग्राम पंचायत कामकाजाचे अधिकार उपसरपंच असलेल्या बाळासाहेब जाधव यांच्याकडे देण्यात आले.जिल्ह्यातील काही मोठ्या ग्राम पंचायतपैकी पिशोर ही एक 17 सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत. या ग्राम पंचायतिचे बाळासाहेब जाधव हे सलग 5 पंच वार्षिकपासून ग्राम पंचायत मधे सदस्य असून मागील पंचवार्षिकलाही उपसरपंच म्हणून श्री. जाधव होते. कामकाज होत नसल्याने उपसरपंचपदाचा त्याग करीत त्यांनी राजीनामा दिला होता. तर मागील वर्षी झालेल्या निवडनुकित विजय संपादन करीत त्यांनी पुन्हा दुसऱ्यादा उपसरपंचपद मिळविले. शिवाय कन्नड़ कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणूनही कार्यरत असून प्रदीर्घ प्रशासन कामकाजाचा अनुभव असलेले बाळासाहेब जाधव प्रभारी सरपंच झाल्याने ग्राम पंचायत सदस्य, ग्रामस्थ, गावाला लागून असलेल्या विविध प्रशासकीय संस्थाच्या प्रमुख अधिकारी वर्गात नवचैत्यन्य निर्माण झाले आहेत. शिवाय सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या