Advertisement

Responsive Advertisement

सायकलिस्ट फौंडेशन औरंगाबाद तर्फे गतिक आरोग्य दिन साजरा

औरंगाबाद- सायकलिस्ट फौंडेशन औरंगाबाद  तर्फे औरंगाबाद वासीयांमध्ये आरोग्याविषयी जनजागृतीसाठी
 जागतिक आरोग्य दिन साजरा केला गेला. जागतिक आरोग्य दिनानिमित्त सिडको चौकातून क्रांती चौक, रेल्वे स्टेशन मार्गे मध्यवर्ती बस स्थानक, व सायकल रॅली ची सांगता युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये करण्यात आली. यात सायकलिस्ट फौंडेशन चे अध्यक्ष डॉ विजय व्यवहारे , खजिनदार डॉ अरुण गावंडे सिनिअर सायकलिस्ट जयंतकाका सांगवीकर, इंजि पांडुरंग लहाने, डॉ भारती, संचालक डॉ प्रशांत महाले, यांनी भाग घेऊन आपल्या आरोग्यासाठी सायकलिंग, रनिंग व पायी चालण्याने होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. या सायकल फेरीत दीक्षा तिवारी, विष्णू अवघड, सौरभ घुले, मनीष जोशी, ज्ञानेश खराडे, अक्षय घुमरे, शंतनू सोमवंशी, प्रसाद कोळेकर, मनोज अंधारे, मनोज वडगावकर, अविनाश, आदी 35 सायकल स्वारांनी सहभाग नोंदविला. 
*औरंगाबाद सायकलिस्ट फौंडेशन वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे सायकलिंग चे महत्त्व नेहमीच पटवून देत आली आहे*, अश्या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन आपले आरोग्य उत्तम राखण्याची गरज असल्याचे मत या कार्यक्रमात इंदिरा IVF चे संचालक डॉ भारती
यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या