Advertisement

Responsive Advertisement

बाबासाहेबांच्या कार्याची नोंद जागतिक स्तरावर-ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे प्रतिपादन


लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे केले आवाहन
मुख्य संयोजक डॉ. अरुण शिरसाट यांचे केले कौतुक
औरंगाबाद:- येथे काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आयोजित फुले-भिमोत्सवाच्या समारोप समारंभात महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीनजी राऊत म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची नोंद आज जागतिक पातळीवर घेतली जात आहे,संपूर्ण जगात, देशात व सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान उल्लेखनीय असे आहे, असेही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले.ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत फुले- भीमोत्सवाचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले की, म.गांधींचे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वैर नव्हते की काँग्रेस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वैर नव्हते, ते म्हणाले की या भाजप सरकारने आरक्षण संपविण्याचा घाट घातलेला आहे, शिक्षणावर होणारा खर्च कमी करून टाकला आहे जेने करून इथला बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला पाहिजे, आणि दलित आणि स्वतःला बहुजनांचे नेते म्हणवणारे लोकं आज भाजप च्या दावणीला बांधलेले आढळतात "भाजपदास" झालेले आहेत,कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण मुख्य संयोजक डॉ.अरुण शिरसाट यांनी केले, कार्यक्रमाला
फुले - भीमत्सवाचे अध्यक्ष विलास बापू औताडे, उपाध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेव पवार, प्रकाश दादा मुगदिया, एम.एम. शेख, इब्राहीम पठाण, हमीद चाऊस, ऍड.इकबालसिंग गिल, जितेंद्र देहाडे, जेम्स अंबिलढगे, अंजलीताई वडजे, किशोर सरोदे,  प्रा.शिलवंत गोपणारायन,  जयपाल दवणे, रेखा राऊत, विजय गायकवाड,डॉ.अनिल पांडे, संतोष भिंगारे, शकुंतला साबळे, चक्रधर मगरे, मंजू लोखंडे, शीला मगरे, वैशाली तायडे, मुदसर अन्सारी,कृष्णा भंडारी, शिरीष चव्हाण,धम्मजोती शिंदे, प्रमोद धुळे, हरचरणसिंग गुलाटी, सागर नागरे, अनुराग शिंदे, विजय चौधरी, आनंद दाभाडे, निलेश आंबेवाडीकर, अशोक चक्रे, सुनील साळवे, गौरव जैस्वाल, उत्तम दणके, यादव अहिरे, रवी लोखंडे, दीपाली मिसाळ साहेबराव त्रिभुवन, वाल्मिक पठारे, चंद्रप्रभा खंडारे, शशिकला मगरे व सचीन लोखंडे आदी  पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक  कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल लहाने तर आभार प्रदर्शन डॉ.मिलिंद आठवले यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या