Advertisement

Responsive Advertisement

माळीवाडा येथे महादेवाची व कानिफनाथ महाराज यांची यात्रा उत्साहात साजरी......

दौलताबाद प्रतिनिधी 
गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर  सरकार ने या वर्षी कोरोनाचे सर्व निबंध हठविल्याने या वर्षी मोठ्या उत्साहाने यात्रा साजरी करण्यात आली. माळीवाडा येथे गुढीपाडवा चा तिसऱ्या दिवशी दि.४ रोजी महादेव शंकर व कानिफनाथ महाराज यांची फार वर्षांपूर्वीची परंपरागत पद्धतीने यात्रा उत्सव साजरी होत असते महादेव शंकराच्या व कानिफनाथ मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच ३० फुट्याच्या उंच बांबू चा काठीला फुलांचा हारानी सजवून रात्री बारा वाजता डफ वाजवीत मिरवणूक काढण्यात येते व महादेव मंदिराच्या पंचवीस फुटाच्या काठीला कन्हेराच्या फुलांच्या माळा करून नागाची फणा काढलेला आकारांची बांबु चा कमटी च्या साह्याने काठीला बांधून त्यावर कन्हेरा च्या फुला ने हारानी सजवण्यात येते त्यानंतर दोन्ही काठ्या मारोती मंदिरापुढे एकत्र होतात तेथे दोन्ही काठ्या सजवण्यात येते त्यानंतर दोन्ही काठ्या घेऊन गावातील वेशित येऊन येथे बाभळीच्या काट्यांचे पाश उभे करून त्यांची पुजा करुन  काही भक्त पळत जाऊन त्यावर उड्या मारतात या बाभळीच्या काट्यांना पेटवण्यात येते तेथेच यात्रेचा समारोप होतो या यात्रेसाठी गावातील सर्व लग्न झालेल्या मुली यात्रेसाठी येतात व गावातील सर्व समाजातील नागरिक एकत्र येतात यावेळी लहान थोर महिला, पुरूष मंडळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या