Advertisement

Responsive Advertisement

श्रीरामनवमी निमित्त शोभायात्रेस युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबाद :- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्रीराम नवमी निमित्ताने संभाजीनगरात भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. आज रविवार रोजी सायंकाळी ४ वाजता शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती ते अमृतेश्वर राममंदिर कुंभारवाडापर्यंत शोभायात्रा निघाली होती. या शोभायात्रेस राम भक्तांसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोरोनाकाळात दोन वर्षे बंद असलेल्या या कार्यक्रमास यावर्षी सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे परंपरा व विधिवत श्रीरामाचे पूजन करून पालखी काढण्यात आली. ढोल पथक व पारंपरिक वाद्य वाजत गाजत शांततेत मिरवणूक पार पडली. यावेळी रामनवमी उत्सव समितीने उपस्थिती भाविकांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या