Advertisement

Responsive Advertisement

डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात होणार १२ हजार झाडांचे हुमनमेड जंगल


जापनीज मियावाकी पध्दतीने दीड एकर परिसरात देशी विदेशी रोपांचे संवर्धन

औरंगाबाद : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व हरितपट्टा तयार होण्यासाठी वृक्षारोपणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्व ओळखून डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात आता होणार १२ हजार १४१ झाडांचे हुमनमेड जंगल होणार आहे. ४५ जातीच्या देशी विदेशी झाडांचे जापनीज मियावाकी पध्दतीने दीड एकर परिसरात संवर्धन केले जाणार आहे.
डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद हेरोडे यांनी सांगितले की, महाविद्यालयात वृक्ष लागवडीसाठी जवळपास दीड एकर जागा उपलब्ध केली आहे. इकोसत्व, सुगी आणि काही सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वी होत आहे.
तर इकोसत्वच्या नताशा झरीन यांनी ग्रीन औरंगाबाद व सुंदर व स्वच्छ परिसर होण्यासाठी महाविद्यालयात अत्याधुनिक पध्दतीने हा प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी महानगरपालिका, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था मदत करत आहे. वर्षभरात १२ फुटांपर्यंत झाडे उंच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक सिध्दार्थ इंगळे, आकाश पोरेवर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्ही. एन. पाटील, पूर्वा कार्तिक, अण्णासाहेब ढवळे, निलेश सोनवणे, गौतम गायकवाड, मीरा कोथिंबीरे, प्रदीप साळवे, गौतम धिवर, पवित्रा बनकर, प्रियंका खरात, राणी तांदळे, किरण भालेराव आदीसह विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या