Advertisement

Responsive Advertisement

घरात विजेचा वापर करताना ग्राहकांनी काळजी घ्यावीअभियंता काळे यांचे आवाहन


धर्माबाद- नगरपालिका कार्यकक्षेत असणाऱ्या धर्माबाद शहर, बाळापुर, रत्नाळी, व सर्व प्रभागातील वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांनी घरात विजेचा वापर करताना अनावश्यक वीज वापरासंदर्भात कटाक्षाने काळजी घ्यावी असे रास्त आवाहन वीज वितरण कंपनीचे अभियंता (शहरी विभाग) प्रणय काळे यांनी केले आहे.
आज घडीला मागणीपेक्षा वीजेचा पुरवठा कमी असल्यामुळे नागरिकांना आकस्मिक भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. मात्र प्रत्येकाने घरांमध्ये विजेचा वापर करताना कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे तर भरपूर विजेची बचत होऊ शकते. घरातील व्यक्तीने या सूचनांचे पालन केल्यास वीज बचत होईलच शिवाय लाईट बिल देखील कमी येईल!
 प्रत्येक खोल्यांमध्ये अनावश्यक वेळी लाईटे  लावले जातात. परंतु त्यामुळे विजेची उधळपट्टी होते. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हा केवळ संबंधित खोलीमध्येच लाईट लावा.फ्रीज सतत उघडल्यास त्यातील थंड तापमान कमी होते व पुन्हा निर्माण करण्यासाठी वीज जास्त जळते. त्या ऐवजी एकदा फ्रीज उघडल्यानंतर आपल्याला आवश्यक असणारे सर्व पदार्थ बाहेर काढून ठेवावेत. आवश्यक असेल तेव्हाच फ्रीज उघडले तर विजेची खूप बचत होईल.
याच प्रमाणे विजेचा वापर करताना आय‌.एस.आय. प्रमाणित उपकरणे वापरावीत. टी.व्ही., फ्रिज, वॉशिंग मशीन, घराबाहेर जाताना सर्व  विजेची उपकरणे बंद केली आहेत का हे तपासून पाहणेही गरजेचे आहे. तेव्हा विजेचा अवास्तव वापर करण्यापेक्षा आवश्यक आणि गरजेनुसार केला तर निश्चितच विजेची बचत होईल आणि आपले विज बिल कमी होईल तेव्हा ग्राहकांनी विजेची उधळपट्टी थांबवा असे आवाहन त्यांनी केले आहे.
*चौकट* सद्यस्थिती शहराच्या दोन्ही बाजूने राज्य मार्गांना जोडणाऱ्या रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. रस्ते रुंदीकरण होत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक पोल शिफ्टिंग चे कामेही मोठ्या प्रमाणात करावीच लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेच्या लपंडावा संदर्भात त्रास होत आहे. पण एकदा ही कामे झाली की भविष्यात शहरवासीयांना विजेच्या संदर्भात कुठल्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही त्यामुळे ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहनही प्रणय काळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या