Advertisement

Responsive Advertisement

बाबासाहेबांची आंबेडकर यांच्या तात्त्विक विचारांची आज आवश्यकता आहे -प्राचार्य डॉ.कृष्णा मालकर

औरंगाबाद-  देवागाव रंगारी येथिल श्री असारामजी भांडवलदार महाविद्यालयात,महापूरूष जीवन संदेश समिती विभागाच्या वतिने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमूख वक्ते म्हनून प्रा.शिवाजी गायकवाड हे प्रमूख वक्ते म्हनून होते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.कृष्णा मालकर होते.त्यावेळी त्यांनी अध्यक्षीय भाषणात बोलतांना सांगितले की,डॉ.बाबासाहेबांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात शिक्षणक्रांती घडून आणत समता,बंधूता,न्याय प्रस्थापित केला.आजही बाबासाहेबांचे तात्त्विक विचार समाजाला तात्विक विचारांची आवश्यकता आहे. त्यामूळे समाजात सामाजिक  चळवळींच्या माध्यमातून मोठी क्रांती केली  सामाजातिल वंचित बहूजनांना माणूस म्हनून न्याय मिळून देण्याचे मोठे कार्य केले असे सांगितले. तर गायकवाड यांनी सांगितले की,समाजातिल शेवटच्या घटकातील व्यक्तीला माणुस म्हनून घडवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देत बाबासाहेबांनी आपल्या चळवळीद्वारे कार्य करत समाजाला जातीजातीमधील जातीभेद नष्ट करण्याचे ध्येय उराशी बाळगून  कार्य उभे केले असे सांगितले.यावेळी संयोजन समितीचे डॉ.वसंत माळी,डॉ.संतोष जाधव,डॉ.विनोद बोरसे यांची मंचावर प्रमूख उपस्थिती होती,या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कू.पूनम कूशर हिने केले तर आभार प्रदर्शन प्रा.कैलास गोरे यांनी केले.यावेळी महाविद्यालयातिल प्राध्यापक ,शिक्षक ,विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या