Advertisement

Responsive Advertisement

औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने फुले-भीममहोत्सवाला सुरुवात

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि म. गांधी यांच्यातील सलोखा आज महत्वाचा- डॉ रावसाहेब कसबे

औरंगाबाद-:येथे फुले- भीम महोत्सवाचे आज मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले, यावेळी जेष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे प्रमुख वक्ते होते,याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उदघाटनाच्या वेळी सांगितले की, आजच्या फळीत वाचन करणाऱ्या नेते पुढाऱ्यांची देशाला गरज आहे,कसबे  म्हणाले की म.गांधी हे एकमेव नेते होते ज्यांनी श्रीमंत आणि उच्चवर्णीय यांना सोडून राष्ट्रभक्त निर्माण केले, विरोधाला विरोध म्हणून गांधींचा विरोध करू नका, कारण गांधी आणि बाबासाहेब यांच्यात सलोखा असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असेही ते म्हणाले, कार्यक्रमाचे उदघाटक माजी मंत्री अनिल पटेल,हिशाम उस्मानी, प्रमुख उपस्थिती  इब्राहिम पठाण, माजी महापौर अशोक सायन्‍ना, अनिल मालोदे, जेम्स आंबीलढगे आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाला औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे किशोर सरोदे प्रा.शिलवंत गोपणारायन, जयपाल दवणे, मुजफ्फर अली, विजय चौधरी, संतोष भिंगारे, डॉ. बाळासाहेब अंभोरे, लोकेश कांबळे, अमोल खरात, प्रा. रमेश वाघ,प्रमोद धुळे, अशोक चक्रे, सलमान सय्यद, शिरीष चव्हाण, रेखा राऊत, विजया भोसले, उत्तम दनके, ऍड.अंजलीताई वडजे , वैशाली तायडे, शकुंतला साबळे, मदने ताई, विजय गायकवाड, निलेश पटेल, वाल्मीक पठारे, साहेबराव त्रिभवन, मुदस्सर अन्सारी आदी उपस्थित होते, महोत्सवाचे मुख्य संयोजक डॉ. अरूण  शिरसाट यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयपाल दवणे तर आभार प्रदर्शन डॉ.मिलिंद आठवले यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या