Advertisement

Responsive Advertisement

स्वातंत्र्य,समानता आणि बंधुत्व म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर- .राहुलकुमार ताठे


आपण सर्वजन भारतीय हाच आपला धर्म , तर राज्य घटना हाच आपला ग्रंथ --प्रा. राहुलकुमार ताठे


ज्ञानविकास विद्यालय भराडी येथे व्याख्यानाचे आयोजन

भराड़ी/ सिल्लोड भारतात अनेक धर्म असले तरी सर्वांगीण विकास साधयचा असेल वाद मीटवायचे असतील तर सर्वजन भारतीयच हाच खरा धर्म मानावा, अनेक धर्मला लागून विविध धर्मग्रंथ असले तरी राज्यघटना हाच सर्वांचा धर्मग्रंथ मानला तर समानता नांदेल स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून हीच खरी व्याख्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची करता येईल.असे विचार प्रसिद्ध व्याख्याते प्रा. राहुलकुमार ताठे यांनी ज्ञानविकास विद्यालय भराडी येथे आयोजित व्याख्यान प्रसंगी केले.

पुढे बोलतांना प्रा. राहुलकुमार ताठे म्हणाले की, आजच्या युगात यशस्वी व्हायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या विद्यार्थ्यांना आत्मसात करणे काळाची गरज आहे. आंबेडकर हे एक उच्च दर्जाचे तत्वज्ञ, समाजसुधारक, क्रांतिकारक आणि भारतीय राज्यघटनेचे निर्माता आहेत. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले भीमराव आंबेडकर यांनी समाजातील जातिभेत सुधारण्यात मोठे योगदान दिले.त्यांचे आयुष्य खूप संघर्षपूर्ण होते आणि सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात त्यांनी भारताला एक अविस्मरणीय योगदान दिले, म्हणूनच त्यांना “आधुनिक भारताचा निर्माता” देखील म्हटले जाते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिकणे आवश्यक असून या जगात काहितरी करून दाखवायचे आहे,अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे.
लक्षात ठेवा,जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात असा मूलभूत विचार बाबासाहेबांनी समाजाला सांगितला.

अन्न, वश्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या अत्यावश्यक गरजा जर पूर्ण नसतील तर आपण स्वतंत्र भारतात आहोत हे म्हणने चुकीचे.डोळस वृत्तीने वागने  अपेक्षित असून देव देवतासमोर लोटांगन घातल्यापेक्षा महापुरुषानच्या विचार, चरित्रवर लोटांगण घातल्यास जिल्हाधिकारी, तहसीलदार सारख्या प्रमुख पदावर आरुढ व्हाल असेही प्रा. ताठे म्हणाले.

दीपप्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.यावेळी शाळेच्या वतीने प्रा. राहुलकुमार ताठे, प्रा. विशाल मांगुळकर, प्रकाश चाथे, श्री. नेवगे, प्रभाकर वाघ यांचा सन्मान करण्यात आला.  सूत्रसंचालन अंकुश सोनवने यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, शालेय वाहन चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट =- वडील वारले, आई शेतीकाम करते, मुलगा माय आजिकडे असतो आजोबा वारले असा विद्यार्थी दररोज 25 किलोमीटर सायकलवर प्रवास करुण शिक्षण घेतो नाव आनंद मगरे वर्ग 8 वी , या विद्यार्थ्यचा मागिल महिन्यात  भराड़ी येथील ज्ञानविकास विद्यालयाने सत्कार करुण कौतुकपर पोस्ट सोशल मेडियाला शेअर केल्या होत्या.त्याची परीस्तिती समजून घेत धानोरा येथील  रवी काकडे यांनी जान्या येन्यासाठी सायक़ल देऊ केली होती. ती सायकल संस्थाप्रमुख अशोकदादा गरुड, प्रमुख वकते प्रा. राहुल ताठे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या