Advertisement

Responsive Advertisement

राष्ट्रीय एकात्मता ही वारकरी संप्रदायामुळेच जोपासली जात आहे.आनिल महाराज बार्शीकर यांचे प्रतिपादन

शांताराम मगर लोणी खुर्द. वैजापुर तालुक्यातील तलवाडा नागवाडी येथील अखंड हरीनाम सप्ताहाच्या निमित्त कीर्तन प्रसंगी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त म्हणून आनिल महाराज बार्शीकर व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध म्रुदंग वादक शिवाजी महाराज काळे यांचा तर उत्कृष्ट सेवा कार्य म्हणून मच्छिद्र महाराज टुपके पंढरीनाथ महाराज पगार चंद्रभान दादा चिकटगावकर यांचा तुकाराम महाराज पगडी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. 

यावेळी  चागंदेव  महाराज सर्वानंदगिरीजी महाराज प्रकाश महाराज सुदर्शन महाराज नितीन महाराज  समाधान  दादाभाऊ महाराज योगेश महाराज मा .भाऊसाहेब चिकटगावकर एकनाथ जाधव  कु.ऊ.बा..सभापती भागिनाथ मगर पंचायत समिती मा उप सभापती राजेंद्र मगर दत्तुभाऊ पाटिल रिखब पाटणी  उत्तमराव निकम आनंद निकम राजन कुन्दे भाऊसाहेब मगर दादाभाऊ मगर  यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना आनिल महाराज बार्शीकर म्हणाले आपल्या जीवनात आपण सतत सुखाच्या शोधत असतो परंतु शाश्वत सुख हाती लागत नाही कारण ते बाह्य जगतातील गोष्टीवर अवलंबून असते. असे सुख हे तात्कालिक असते. ती मनाची एक स्थिती असते. अध्यात्म आपल्याला बिनशर्त आणि शाश्वत आनंद घेण्याची कला शिकवते म्हणून अध्यात्म आपल्या जीवनात संबंधित आहे. आपले आंतरिक सुख हि मनाची स्थिती नाही तर ती आत्म्याची स्थिती आहे. अध्यात्म हि ज्ञानाची अशी शाखा आहे जी आत्मज्ञानाविषयी आणि आत्मसुखाविषयी विचार करते. जी आपणाला आपले जीवन एका उंच पातळीवरून जगण्याची प्रेरणा देते.
संसारिक ठेवा हे संपणारे धन आहे मात्र पारमार्थिक धन चिरकाल टिकणारे असून पारमार्थिक धनाने पिढी संस्कारित केली जाते, भाववृत्तीने केलेला परमार्थ हा सफल ठरतो.
भक्तीभाव तिथे देव असून परमार्थाने मन,बुद्धी अंतकरण शुद्ध होते. सर्व श्रीमंतीपेक्षा अध्यात्मिक श्रीमंती सर्वात मोठी असून अध्यात्मिक श्रीमंती टिकाऊ असते,
भारतीय संस्कृति चा मान वाढविन्यामध्ये वारकरी संतांचे मोठे योगदान आहे . मानवी जीवन सुसंस्कारीत करण्यासाठी संतांनी विविध मार्ग सांगितले त्यांतील महत्त्व पुर्ण मार्ग म्हणजे  संतांनी निर्माण केलेले ग्रंथ . त्यातील विचार सामान्य समाजापर्यंत पोहचवन्याची सोपी पध्दती म्हणजे हरीनाम सप्ताह होय. नैतिक आचरण , त्याग , ईश्वराविषयी प्रेम , या तत्वावर संता नी जीवन समर्पित केले शिक्षण , संस्कार , संस्कृति व धर्म या संत पंरमपरा टिकविण्याकरिता तरुणांनी  एकत्रित येऊन संतविचार , आचरणात आणावे सुंदर जीवन जगण्यासाठी नैतिकता , स्वच्छता , निष्ठता व संवेदनशीलता या मुल्याचे पालन करावे.आसे भावनिक आवाहन आनिल महाराज बार्शीकर यांनी केले.
पुढे बोलतांना बार्शीकर म्हणाले भगवान श्रीकृष्णाने द्वापारयुगात गायी चारताना सर्व गोपालांना घेऊन केलेला काला हा अवर्णीय असा होता. काल्याचा प्रसाद हा केवळ संत संगतीने मिळत असल्याने वारकरी संप्रदायात व मानवी जीवनात या प्रसादाला विशेष महत्त्व आहे. त्याच काल्याच्या आधार घेऊन वारकरी संप्रदायाने आज समाजातील धर्म, जाती आणि मनुष्यातील भेद मोडीत काढला.काल्यामळे मानसिकरीत्या सर्वांचे एकत्रीकरण होते. राष्ट्रीय एकात्मता ही वारकरी संप्रदायामुळेच जोपासली जात आहे. संस्कार आणि प्रचाराच्या माध्यमातून समाजमनाचे खरे प्रवर्तक हा वारकरी संप्रदाय ठरला आहे. देव आणि भक्तांचा संगम ज्या ठिकाणी घडतो अशा ठिकाणी काला अनुभवायला मिळतो. समाजप्रबोधन करताना संतांनी सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी या काल्याची परंपरा सुरू ठेवली आणि असा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊन प्रसाद घेत राहू असे संत तुकाराम महाराज यांनी अभंगातून सांगितले असल्याचे  आनिल महाराज बार्शीकर यांनी सांगितले.
महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली. दहीलाह्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले विठ्ठल मगर यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
टाकला.यावेळी यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या