Advertisement

Responsive Advertisement

मराठा तेज च्या वतीने छ संभाजीराजे आदर्श पुरस्काराने मान्यवरांचा गौरव

औरंगाबाद - 

मराठा तेज वाहिनीच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मराठा तेजचे मुख्य संपादक तथा पत्रकार संघाचे सरचिटणीस नारायण जाधव पाटील हे दरवर्षी मराठा तेज चा वर्धापनदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करित असतात त्यांनी या वर्षी छञपती संभाजीराजे यांच्या नावाने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या आणि करत असलेल्या मान्यवर मंडळींचा औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद संशोधन केंद्र सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यस्तरीय छ संभाजीराजे  आदर्श पुरस्कार देऊन गौरव केला प्रसिध्द संगीतकार गायक अतुल दिवे ,समाजसेवक गौतम संचेती , बुलंद शक्तीचे संपादक रामेश्वर दरेकर ,  प्रा चंद्रकांत भराड , सुरेश वाकडे पाटील , सुहास दासराथे
लेखिका प्रा संध्या मोहिते , प्रसिद्ध व्याख्यात्या अर्चना भोर , नवोद्योजक मधुकर जाधव , लेखिका व्याख्यात्या कोमल औताडे  यांना या वर्षीचा मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय छञपती संभाजीराजे आदर्श पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला याबरोबरच उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या पत्रकार सुनील वैद्य ,शेख जावेद ,प्रा शिवाजी गायकवाड , शिक्षक सर्जेराव जाधव , कवी शामकांत पाचपुते , अडोकेट  सुधीर मुळे , डॉ टी के डकले ,रवी राजपूत , सुनीला क्षत्रिय ,संतोष मिमरोट यांच्यासह अन्य मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला 
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर , प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल जी गायकवाड , काँग्रेसचे शहर अध्यक्ष हिषाम उस्मानी , पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष संपादक प्रा डॉ प्रभू गोरे ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष शांताराम मगर , संपादक छबुराव टाके , अंकत चव्हाण , विजय काकडे , माजी नगरसेविका संगीता जाधव ,प्रा मनीषा मराठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या वेळी प्रसिद्ध व्याख्यात्या अर्चना भोर यांचे व्याख्यन देखील सादर करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्थाविक संपादक नारायण जाधव पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन शामकांत पाचपुते व प्रा शिवाजी गायकवाड तर आभार प्रदर्शन कोमल औताडे यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या