Advertisement

Responsive Advertisement

विकांसकामाच्या जोरावर नागरिक शिवसेनेच्या पाठीशी - नंदकुमार घोडेले


वीटखेडा वॉर्डात सिमेंट रस्त्यांचे उद्घाटन
औरंगाबाद:- नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी शिवसैनिक नेहमी तत्पर असतो. त्यामुळे नागरिक व प्रशासन यांच्यात दुवा म्हणून शिवसैनिक कार्यरत असतो. या पद्धतीमुळे विकांसकामाच्या जोरावर नागरिक शिवसेनेच्या पाठीशी असतो, असे प्रतिपादन माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले.
राज्यसरकार विविध माध्यमातून शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. नागरिकांना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून यापुढे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन घोडेले यांनी केले.
वीटखेडा वॉर्डात विविध विकामकामाचा शुभारंभ व  सिमेंट रस्त्यांचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी निलेश पाटील, संजय टोनपे, भागचंद मोटे, सचिन कणकुटे, आबा चौधरी, कुलकर्णी गुरूजी, सुधीर हडपे, राजू बनकर, शहाणे आदीसह नाथपुरम,  आनंदग्राम भागातील नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या